कल्याण : बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींबरोबर झालेल्या घृणास्पद घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण मधील खडकपाडा पोलिसांनी आपल्या पोलीस ठाणे हद्दीतील सर्व प्राथमिक, माध्यमिक, पालिकेच्या शाळा प्रमुख, मुख्याध्यापक यांना खडकपाडा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याशी संवाद झाला. बदलापूरसारखा प्रकार घृणास्पद प्रकार कोणत्याही शाळेत घडू नयेसाठी प्रत्येक शाळेने अधिकाधिक सीसीटीव्ही विद्यार्थ्यांच्या चलत मार्गावर बसवावेत, अशा सूचना कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी केल्या.

या बैठकीला खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अमरनाथ वाघमोडे उपस्थित होते. बदलापूरसारख्या घटनेची पुनरावृत्ती कल्याण परिसरात होऊ नये यादृष्टीने साहाय्यक आयुक्त घेटे, वरिष्ठ निरीक्षक डॉ. वाघमोडे यांनी शाळा व्यवस्थापन प्रमुख, मुख्याध्यापक यांच्याशी संवाद झाला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

हेही वाचा…त्या चिमुकल्यांची तब्येत व्यवस्थित; अफवांवर विश्वास ठेवू नका, सहकाऱ्यांचे आवाहन

शाळेतील गैरप्रकार रोखण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक शाळेने अधिकाधिक सीसीटीव्ही शाळेच्या आवारात बसून घ्यावे. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही यापूर्वी बसविले असतील त्यांनी ते चालू स्थितीत आहेत की नाही ते तपासून घ्यावेत. सीसीटीव्हीचा डीव्हीआर सुस्थितीत आहे की याची पाहणी करून तो बंद असेल तर चालू स्थितीत करून घ्यावा. याबाबत कोणत्याही शाळेने हलगर्जीपणा करू नये.

हेही वाचा…शिवसेना शहर प्रमुखावर गुन्हा दाखल; महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्याने वाद

मुलींना स्वच्छतागृहात नेताना महिला सेविकांची नेमणुका कराव्यात. असतील त्यांना गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याविषयी प्रशिक्षण द्यावे. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची पडताळणी करून घ्यावी. मुलींच्या विभागासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी नियुक्त कराव्यात. शाळेत कोणताही अनुचित प्रकार घडत असल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. यासाठी खडकपाडा पोलीस ठाण्यातून सर्व प्रकारचे सहकार्य शाळा व्यवस्थापनाला केले जाईल, असे आश्वासन साहाय्यक पोलीस आयुक्त घेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक घेटे यांनी मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन प्रमुखांना दिले. संचालक, मुख्याध्यापक यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांना पोलीस अधिकाऱ्यांनी उत्तरे देऊन त्याचे निरसन केले