Kalyan Crime News : कल्याण पूर्व भागात असलेल्या आयडियल शाळेतील एका विद्यार्थ्याने रविवारी राहत्या घरी गळफास ( Kalyan Crime ) घेऊन आयुष्य संपवलं. शाळेतल्या एका शिक्षिकेकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचललं असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. विघ्नेश पात्रो असं या मुलाचं नाव आहे. तो अवघ्या बारा वर्षांचा होता. आत्महत्येपूर्वी ( Kalyan Crime ) एक चिठ्ठी विघ्नेशने लिहिली आहे. त्यामध्ये त्याने भावनिक ओळी लिहिल्या आहेत तसंच शिक्षिकेच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचंही म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

विघ्नेश पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात वास्तव्याला होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रा हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास लावून घेत आयुष्य संपवलं. वडील घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत ( Kalyan Crime ) आढळला. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उघडून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह ( Kalyan Crime ) दिसला. हे दृश्य पाहून वडिलांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरवून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उशीर खूप झाला होता. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.

case against father, father abusing daughter,
मुंबई : पाच वर्षांपासून मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Hathras in Uttar Pradesh
Hathras News : धक्कादायक! शाळेची भरभराट व्हावी म्हणून दुसरीच्या मुलाची गळा दाबून हत्या; काळी जादू असल्याचा पोलिसांना संशय
Kerala Ban On Digital Notes
Kerala Ban On Digital Notes : आता पालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार नाही मुलांचा गृहपाठ, डिजिटल स्वरुपातील नोट्सवर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय!
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
18 year old college girl student commits suicide by hanging self in his hostel room
College Girl Suicide : नाशिकमध्ये वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
sexual assault cases increase in state even children are not safe
शहरबात : आसपास वावरणारे शैतान…

हे पण वाचा- नागपूर : ‘आई, मी मोबाईलमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष केले’, असे लिहून मुलीने संपविले जीवन

निरागस विघ्नेशने चिठ्ठीत काय लिहिलं ?

विघ्नेश पात्रो याने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शाळेतील एका शिक्षिकेचा आणि मुलाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्याने म्हटले होते की, ‘पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडवल्याने मी आत्महत्या ( Kalyan Crime ) करत आहे’, असे विघ्नेशने चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

कोळसेवाडी पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला. एका राजकीय व्यक्तिशी संबंधित ही शिक्षण संस्था आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण जवळील वरप येथे सेक्रेड हार्ट शाळेतील अनीश दळवी या विद्यार्थ्याने शाळा चालकांच्या मनमानीला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणात शाळेचे संचालक आल्विन ॲन्थोनी यांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली होती. अलीकडे शिक्षकांच्या त्रासामुळे विद्यार्थी आत्महत्या करू लागल्याने पालक वर्गाने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.