scorecardresearch

ठाणे मॅरेथॉनमध्ये करण शर्मा विजेता

ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलीस यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.

ठाणे मॅरेथॉनमध्ये करण शर्मा विजेता
ठाणे मॅरेथॉनमध्ये धावताना सहभागी धावपटू (छाया : दीपक जोशी)

ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त ‘उत्सव ७५ ठाणे’ अंतर्गत ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलीस यांच्या वतीने रविवारी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी पुरुष (वयोगट १८ वर्षांवरील खुला गट), महिला (१६ वर्षांवरील खुला गट) असे दोन गट होते. मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात करण शर्माने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अनिल कोरवी आणि तृतीय क्रमांक नीलेश मोरेने मिळवला. महिला गटात प्रियांका पाईकराव विजेती ठरली. रिया मोरे आणि आदिती पाटीलने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला.

पोलिसांच्या मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक रामनाथ मेंगाळ, द्वितीय प्रदीप भोय तर तृतीय योगेश वारे यांनी, तर महिला गटात प्रथम क्रमांक शोभा देसाई, द्वितीय माया वाळूतेठे तर, तृतीय क्रमांक धनश्री निकनके यांनी मिळवला.

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karan sharma winner of thane marathon zws

ताज्या बातम्या