scorecardresearch

Premium

कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड

कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याची गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.

Kasara-CSMT railway stopped
सीएसएमटीकडून कसाराकडे जाणाऱ्या लोकल, एक्सेप्रस वाहतूक सुरळीत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण- मध्य रेल्वेच्या खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे कसाराकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल, लांबपल्ल्याची गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. मंगळवारी सकाळी ११. २० वाजता मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे.

Disaster management has collapsed
पनवेल: रेल्वे प्रशासनात आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा 
passengers stuck in tutari express
पनवेलजवळ मालगाडी घसरल्याचा प्रवाशांना फटका, १० तासांपासून प्रवासी खोळंबलेल्या एक्सप्रेसमध्ये
Western Railway services disrupted
पश्चिम रेल्वेची लांब पल्ल्याची सेवा विस्कळीत
Kasara CSMT railway traffic
कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक सुरळीत, मालगाडीच्या इंजिन दुरुस्तीचे काम पूर्ण

सीएसएमटीकडून कसाराकडे जाणाऱ्या लोकल, एक्सेप्रस वाहतूक सुरळीत आहे, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मालगाडीच्या इंजिनमधील बिघाड दुरुस्तीचे काम रेल्वेच्या तंत्रज्ञांनी हाती घेतले आहे. बंद पडलेल्या मालगाडीच्या पाठीमागे कसारा-सीएसएमटी लोकल, भुवनेश्वर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, धुळे-दादर एक्सप्रेस खोळंबून राहिल्या आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

आणखी वाचा-कल्याण-शिळफाटा रस्त्यावर उन्नत मार्गाची चाचपणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशावरून ‘एमएसआरडीसी’कडून अभ्यास

मागील दोन वर्षापासून खर्डी ते खडवली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालगाडी रुळावरुन घसरणे, याच भागात इंजिनमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रेल्वे मार्गाची वरिष्ठांची पाहणी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनेकडून केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kasara csmt railway stopped goods train engine failure near khardi railway station mrj

First published on: 26-09-2023 at 12:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×