कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पालिका हद्दीतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी चार यांत्रिकी वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया निविदा पध्दतीने पूर्ण केली आहे. लवकरच ही वाहने पालिकेत दाखल होणार आहेत. या यांत्रिक वाहनांच्या साहाय्याने कल्याण, डोंबिवलीतील सिमेंट काँक्रिट रस्त्यांची साफसफाई केली जाणार आहे.

पालिका हद्दीतील सिमेंट काँक्रिट रस्ते यांत्रिकी वाहनाने सफाई करण्यात यावेत. यामुळे या रस्त्यांवरील सफाई कामगारांचे पालिकेचे मनुष्यबळ इतर भागात वापरात येईल, असा आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचा प्रस्ताव होता. आयुक्तांच्या आदेशावरून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून स्वच्छ शहर लेखाशीर्षकांतर्गत ही चार यांत्रिकी वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून जेम संकेतस्थळावर ही निवीदा प्रक्रिया पार पडली. स्पर्धात्मक निवीदा प्रक्रियेतून पुणे येथील मे. कॅम ॲव्हिडा कंपनीला रस्ते सफाई कामासाठी यांत्रिकी वाहने खरेदी करण्याचा कार्यादेश देण्यात आला.

Kdmc installed 180 cctv cameras on 23 ganesh immersion procession route in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
on Monday man killed on the roof of a building in Kolshet
ठाण्यात शीर धडवेगळे करून एकाची हत्या
transgender stealing gold worth rs 2. 4 lakh from home who came for ganpati darshan in kalyan
कल्याणमध्ये गणपती दर्शनासाठी घरात येऊन तृतीयपंथीय टोळीकडून सोन्याच्या ऐवजाची चोरी
construction of illegal building near kdmc h ward office
कडोंमपाच्या ह प्रभाग कार्यालयाजवळ बेकायदा इमारतीची उभारणी; सामासिक अंतर न सोडल्याने परिसरातील सोसायटीतील रहिवासी अस्वस्थ
vehicle theft, Kalyan-Dombivli, theft Kalyan-Dombivli,
कल्याण-डोंबिवलीत वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ
Police seized prohibited animal meat worth rs 4 lakh near dombivli zws 70
डोंबिवलीजवळ चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त
Suicide Kalyan-Dombivli,
११ वर्षाच्या मुलाची प्रेमप्रकरण उघड झाल्याने आत्महत्या, कल्याण- डोंबिवलीत २ आत्महत्या

हेही वाचा >>> कल्याण जवळील शहाड येथे जुन्या भांडणातून  कुटुंबाला ठार मारण्याची तरूणाची धमकी

ही वाहने खरेदीची प्रक्रिया सुरू असून, लवकरच ही वाहने पालिकेत दाखल होणार आहेत, असे आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले. या वाहनांची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करून, मग ही वाहने प्रत्यक्ष साफसफाई कामासाठी रस्त्यावर उतरविण्यात येणार आहेत.

यांत्रिकी वाहने

रस्ता सफाई यांत्रिकी वाहन हे साडे सहा घनमीटर क्षमतेचे आहे. ते नैसर्गिक वायूवर चालणारे आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यात हे वाहन महत्वाची भूमिका बजावणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान या वाहनात आहे. या वाहनाच्या मागील बाजूस सफाईसाठी दोन दाते (ब्रश) असतील. दोन्ही चाकांच्या मध्यभागी चेसीसखाली दोन गोलाकार चक्राकार पध्दतीने फिरणारे दोन दाते (ब्रश) असणार आहेत. वाहनाच्या पाठीमागील बाजूस एक मोठी वाहिका जोडलेली आहे. ही वाहिका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांखालील, अडगडळीच्या जागेतील कचरा प्रखर दाबाने वाहिकेच्या माध्यमातून यंत्रामध्ये खेचून घेईल. या वाहनांंमुळे रस्त्यांवरील धुळीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. या वाहनांवर एक चालक, तीन कामगार सोबत असतील. या यांत्रिकी वाहनांचा अधिकाधिक वापर रात्रीच्या वेळेत करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. या स्वच्छतेच्या कामावर घनकचरा उपायुक्तांसह स्वच्छता निरीक्षक, मुकादम ही यंत्रणा देखरेखीसाठी असणार आहे.

हेही वाचा >>> डोंबिवलीजवळ चार लाखाचे जनावारांचे मांस जप्त

या यांत्रिकीकरणामुळे ज्या काँक्रिट रस्त्यांवर यापूर्वी सफाई कामगारांकडून सफाई केली जात होती. त्या रस्त्यांवरील कामगार इतर भागात फिरवणे पालिकेला शक्य होणार आहे.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ५४ किमी लांबीचे काँक्रिट रस्ते यांत्रिकीकरणाने सफाई करण्याचे नियोजन केले आहे. ही यांत्रिकी वाहने लवकरच पालिकेत दाखल होतील. या वाहनांमुळे सफाई करताना धूळ आणि अन्य घटक हवेत उडणार नाहीत. त्यामुळे श्वसन विकार आणि इतर आरोग्याच्या समस्या कमी होण्यास साहाय्य होईल. डॉ. इंदुराणी जाखड, आयुक्त