चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या ;कल्याण पूर्व तिसगाव पाडा येथील प्रकार | Killing of wife due to suspicion of character amy 95 | Loksatta

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या ; कल्याण पूर्व तिसगाव पाडा येथील प्रकार

पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने सोमवारी सकाळी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या ; कल्याण पूर्व तिसगाव पाडा येथील प्रकार
( संग्रहित छायचित्र )

पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणाऱ्या पतीने सोमवारी सकाळी पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी महिलेला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेजाऱ्यावर पतीने हल्ला केल्याने तोही गंभीर जखमी झाला आहे. कोळसेवाडी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. गंभीर जखमी शेजाऱ्यावर कळवा येथील छ. शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेत लघुलेखकाला सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

पोलिसांनी सांगितले, सुनील शिंदे (४०) हा पत्नी शिल्पाच्या (३५) चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. यावरुन त्यांच्यात सतत भांडण होत होती. या सततच्या भांडणाला शिल्पा कंटाळली होती. सुनील, शिल्पा यांच्यात नियमित भांडणे होतात. याची माहिती शेजाऱ्यांना होती. त्यामुळे ते या घरगुती भांडणात पडत नव्हते.

हेही वाचा >>> डोंबिवलीकर वैतागले, अरुंद रस्त्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी, त्यात पालिकेच्या कचरा वाहू गाड्यांच्या बेफिकीरीची भर

सोमवारी सकाळी शिल्पा आणि सुनील यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी संतप्त झालेल्या पती सुनीलने घरातील धारदार शस्त्राने पत्नी शिल्पावर रागाच्या भरात वार केले. शिल्पा बचावासाठी ओरडू लागल्याने शेजारी राहत असलेले संदेश परब भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी बेभान झाल्याने सुनीलने संदेशवर हल्ला केला.या हल्ल्यात संदेश गंभीर जखमी झाला. पत्नीचा जागीच मृत्यू झाला.ही माहिती मिळताच कोळसेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सुनील शिंदेला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सोनसाखळी चोरांमुळे महिला जखमी ,नवरात्रीच्या पूर्वसंध्येला दोन घटना ; अंबरनाथच्या महिलांमध्ये घबराट

संबंधित बातम्या

कसारा-कल्याण दरम्यान देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा; औरंगाबादमधील सहा जणांना अटक
कल्याण डोंबिवली पालिका निवृत्त अधिकाऱ्याच्या बांधकामाला जिल्हा परिषदेची बनावट मंजुरीची कागदपत्रं; ‘ईडी’, विशेष तपास पथकाकडे तक्रार
कल्याणमध्ये मोटारीच्या काचा फोडून कारटेपच्या चोऱ्या
कल्याण पूर्व सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालकांचा बंद; प्रवाशांचे हाल
मूल्य, तत्त्वे जोपासत तरुणांनी करियर घडवावे!; विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: शिस्त म्हणजे शिस्त! कळपातून वेगळं धावणाऱ्या हत्तीच्या पिल्लांना हत्तीने कसा धडा शिकवला पाहा
“…म्हणूनच आम्ही अलिबागमध्ये घर खरेदी केले” रणवीर सिंगने केला खुलासा
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
“बावनकुळे मास्तरांनी समजावून सांगावं की…”; सामाजिक वातावरण बिघडतंय म्हणणाऱ्या बावनकुळेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर
उघड्या मॅनहोलची समस्या : अनुचित प्रकार घडल्यास महानगरपालिकेला जबाबदार धरणार; उच्च न्यायालयानचा इशारा