बदलापूरः किसन कथोरे यांना माझ्या वडिलांनी मोठी मदत केली होती. त्यांची राजकीय सुरूवात माझ्या वडिलांनी सुरू करून दिली. तसेच ते जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी माझ्या वडिलांकडे येत होते, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे मुरबाडचे उमेदवार सुभाष पवार यांनी आमदार किसन कथोरे यांचा खरपूस समाचार घेतला. वडिलांना पाडले आहे तर मुलालाही पाडू असे वक्तव्य किसन कथोरे यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर बोलताना शनिवारी पवार यांनी हे वक्तव्य केले. अरेरावीने बोलणे हे कथोरेंची ख्याती आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

आमदार किसन कथोरे यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सुभाष पवार यांच्यावर पहिल्या दिवसापासून थेट हल्लाबोल चढवला. त्यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी मतदारसंघात ठेकेदार हवा का असा प्रश्न उपस्थित करत पवार यांना लक्ष्य केले होते. तर अर्ज भरण्याच्या दिवशी माजी आमदार गोटीराम पवार यांचा केलेल्या पराभवावर बोट ठेवत, वडिलांना पाडले तर मुलालाही पाडू असे वक्तव्य केले होते.

MP Amar Kale is successful in bringing candidature for his wife Mayura Kale in Arvi Assembly Constituency
स्वत: खासदार झाले, आता आमदारकीसाठी पत्नीला तिकीट… काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी फेरून…
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Manikrao Thackeray could not retain constituency for himself in Yavatmal district
काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाला मतदारसंघ मिळेना… पक्षाने मुलालाही वाऱ्यावर सोडल्याने…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
maval assembly constituency
मावळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

हेही वाचा – ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

हेही वाचा – शिदेंच्या उमेदवाराचे विजयासाठी स्वपक्षियांसमोर लोटांगण, आमदार बालाजी किणीकर यांची शिवसैनिकांसमोर दिलगिरी

सुभाष पवार यांचे वडील गोटीराम पवार हे चार वेळा मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार होते. सुरूवातीला कथोरे पवार यांच्याच नेतृत्वात स्थानिक पातळीवरच्या निवडणुका लढले होते. याच इतिहासाची आठवण करून देत सुभाष पवार यांनी शनिवारी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात वडिलांमुळेच झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी ते वडिलांना भेटायला यायचे, असे सांगत त्यांनी कथोरे यांना वडिलांनी मोठी मदत केल्याचा पुनरूच्चार केला. तसेच अरेरावीणे बोलणे हा कथोरेंचा इतिहास आहे, असेही ते म्हणाले. बदलापूर शहरात माध्यमांशी बोलताना पवार यांनी कथोरेंचा समाचार घेतला. तसेच यावेळी बोलताना, शहरात अनेक प्रश्न असून वीज, वाहतूक प्रश्नांवर लोकप्रतिनिधींवर नागरिकांची मोठी नाराजी असल्याचेही पवार म्हणाले.