चोरांचा प्रतिकार करणाऱ्या तरूणीवर चाकूहल्ला

भिवंडी येथील अंजुरफाटा भागात गळ्यातील सोन्याचे लाॅकेट चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या तरूणावर चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

चोरांचा प्रतिकार करणाऱ्या तरूणीवर चाकूहल्ला
चोरांचा प्रतिकार करणाऱ्या तरूणीवर चाकूहल्ला

ठाणे : भिवंडी येथील अंजुरफाटा भागात गळ्यातील सोन्याचे लाॅकेट चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा प्रतिकार करणाऱ्या तरूणावर चाकू हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात एका वृद्धेचा सोनसाखळी चोरांनी गळा आवळून सोनसाखळी लांबवली होती. ही घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने ठाण्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

भिवंडी येथील काल्हेर भागात राहणारे धीरज कुमार हे रविवारी  रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अंजुरफाटा येथून पायी जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून दोनजण आले. त्यातील एकाने धीरज यांच्या गळ्यातील सोन्याचे लाॅकेट खेचण्याचा प्रयत्न केला. धीरज यांनी त्या चोरट्याचा प्रतिकार करून त्याला पकडले. त्याचवेळी दुचाकी चालविणारा दुसरा चोरटा दुचाकीवरून खाली उतरला. त्याने हातातील चाकूने धीरज यांच्या पोटावर चाकू हल्ला केला. या घटनेत धीरज हे जखमी झाले. त्यानंतर दोन्ही चोरटे दुचाकीवरून पळून गेले. या घटनेप्रकरणी सोमवारी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणीसाठा ९१ टक्क्यांवर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी