ठाणे : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राज्य सरकारकडून राबविली जाते. या योजनेअंतर्गत गरजू महिलांच्या बँक खात्यात मासिक १५०० रुपये जातात. परंतु अनेक अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेत अर्ज केले होते. त्यामुळे राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांचे ई-केवायसी प्रक्रिया करत आहे. या प्रक्रियेस राज्य सरकारने मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानुसार ज्यांनी ई-केवायसी करताना पर्याय निवडताना नजरचूकीने चुक केली आहे. त्यांना चूक सुधारता येणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वच महिलांना याचा फायदा होणार आहे.
राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबविली जाते. या योजनेत पात्र नसतानाही अनेकांनी गैरफायदा घेत योजने अर्ज केले होते. त्यामुळे त्या महिलांना अपात्र करण्याची प्रक्रिया केली जात आहे. पात्र लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी माध्यमातून आधार पडताळणीद्वारे प्रक्रिया करायची होती.
या योजनेंतरर्गत लाभार्थींची जलदगतीने पडताळणी करण्यासाठी ऑनलाईन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी दिली. त्यानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. परंतु पुन्हा एकदा मुदतवाढीची मागणी केली जात असल्याने आता पुन्हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे. त्यानुसार ई-केवायसीसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यानंतर कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार नाही असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.
यामुळे मुदतवाढ… –
शासन निर्णयानुसार, प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी-कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे किंवा कसे याबाबतचा पर्यय निवडताना चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे, अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसी मध्ये मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आली आहे.
