ठाणे : कळव्यात घरांवर दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

जखमी महिलेवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत

ठाण्यातील कळवा या ठिकाणी असलेल्या चाळीवर दरड कोसळून या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर १ जण जखमी झाला आहे. कळवा येथील अटकोनेश्वर नगर या ठिकाणी असलेल्या ज्ञानगंगा शाळेजवळच्या चाळीवर दरड कोसळली. दरड जवळच्या काही घरांवर पडली. ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकले. ज्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली आहे. बीरेंद्र जसवार (वय-४०) आणि सनी जसवार (वय १०) अशी मृतांची नावं आहेत. हे दोघेही एकाच कुटुंबातले आहेत. नीलम जसवार या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. बचावकार्यादरम्यान तिघांना बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे दोघांना मृत घोषित करण्यात आलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Landslide at kalwa two person death one woman injured scj

ताज्या बातम्या