कल्याण- कल्याण पश्चिमेतील एका हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री मित्रांसमवेत भोजनास गेलेल्या एका २५ वर्षाच्या वकिलाला किरकोळ कारणावरुन हाॅटेलचे व्यवस्थापक आणि तेथील तीन कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या वकिलाला पकडून कर्मचाऱ्यांनी हाॅटेल बाहेर ढकलून दिले.

ॲड. ओमकार दिलीप पवार (रा. देवीदास चाळ, गणेशनगर, कोळसेवाडी, कल्याण) असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, ॲड. पवार आणि त्यांचे मि्त्र गौरव सिंग, राहुल मुथ्थुस्वामी कल्याण रेल्वे स्थानका जवळील अमर पॅलेस हाॅटेलमध्ये मंगळवारी रात्री भोजन करण्यासाठी गेले होते. ॲड. पवार यांच्या समोरील टेबलावर त्यांचा मित्र गौरव सिंग बसला होता. ॲड. पवार गौरवला तू टेबलावर बसू नकोस, खुर्चीत बस, असे सांगून त्याची समजूत काढत होते.

old man hit by bike rider, Kamothe,
कामोठेत वृद्धाला दुचाकीस्वाराने उडवले
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

हेही वाचा >>>डोंबिवलीतील फलकांवर नाना पटोलेंचा भावी मुख्यमंत्री उल्लेख, छबीतून बाळासाहेब थोरात गायब

तेवढ्यात हाॅटेलचे व्यवस्थापक आणि इतर तीन कर्मचारी ॲड. पवार यांच्या जवळ आले. त्यांनी पवार यांना काही न विचारता थेट मारहाण सुरू केली. पवार कर्मचाऱ्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते. एका कर्मचाऱ्याने त्यांचा हात जोराने पिरगळून त्यांना ओढत हाॅटेलच्या प्रवेशव्दारावर नेऊन तेथून जोराने रस्त्यावर ढकलले. पवार यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.पवार यांनी याप्रकरणी हाॅटेल कर्मचाऱ्यांविरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.