Premium

कलानींना वळविण्याचे पवार गटाचे प्रयत्न

अजित पवारांच्या शपथविधीला कलानी गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी कलानी यांच्या निवासस्थानी भेटी सुरू केल्या आहेत.

sharad pawar remark against Fascist forces
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

उल्हासनगर : उल्हासनगरात सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे कलानी कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून काहीसे तटस्थ होते. परंतु अजित पवारांच्या शपथविधीला कलानी गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी कलानी यांच्या निवासस्थानी भेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तोंडावर कलानींची मते आपल्या पारडय़ात पाडण्यासाठी पवार गट प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर महापालिकेसह विधानसभा आणि लोकसभेमध्ये मतांची बेगमी करायची असल्यास कलानी कुटुंबाला जवळ ठेवावे लागते. त्यानुसार २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने अनेक आरोप-प्रत्यारोपांनंतरही माजी आमदार पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांना जवळ केले. त्यानंतर भाजपला पालिका निवडणुकांमध्ये सत्ता प्राप्त करता आली. मध्यंतरीच्या काळात बेबनाव झाल्याने कलानी गटाने भाजपला पराभवाची धूळ चारत शिवसेनेला मदत केली. त्यामुळे संख्याबळ असूनही भाजपचा महापौरपदाचा उमेदवार पराभूत झाला होता. त्यानंतर भाजप आणि कलानी कुटुंबांमध्ये मोठे अंतर निर्माण झाले.

मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलानी आणि गंगोत्री गटामध्ये वाकयुद्ध रंगले. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी कलानी गटाची साथ दिली होती. त्यामुळे कलानी गटाचे महत्व अधोरेखीत झाले होते. अजित पवार यांनी महायुतीला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी कलानी गटातील काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर शरद पवार यांच्या सभेतही कलानी गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे कलानींची नेमकी भूमिका काय याबाबत प्रश्नचिन्ह होते.

परिसरात वरचष्मा

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात कलानींचे वर्चस्व आहे. त्यांच्या गटाचे सर्वाधिक नगरसेवक या भागात आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी खुद्द तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीम ओमी कलानी गटाने आयोजित केलेल्या सभेत मंचावर हजेरी लावली होती. त्यामुळे कलानींचे महत्व अधोरेखीत झाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Leaders of sharad pawar group efforts to divert kalani family ysh

First published on: 27-09-2023 at 01:54 IST
Next Story
ठाणे मतदारसंघाचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; शंभूराज देसाई यांचे मत