डोंबिवलीत समीर वानखेडे यांचे उद्या व्याख्यान | Lecture tomorrow by Sameer Wankhede in Dombivli amy 95 | Loksatta

डोंबिवलीत समीर वानखेडे यांचे उद्या व्याख्यान

महसूल सेवेतील सनदी अधिकारी समीर वानखेडे यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांचे भविष्य’ या विषयावर २८ जानेवारी, शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

sameer wankhede
समीर वानखेडे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

महसूल सेवेतील सनदी अधिकारी समीर वानखेडे यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि युवकांचे भविष्य’ या विषयावर २८ जानेवारी, शनिवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली पूर्वतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे.युवकांच्या जीवनात स्पर्धा परीक्षांना खूप महत्व आहे. या स्पर्धा परीक्षांमधून अनेक मुले यशाची शिखरे गाठतात. अशा मुलांना अनुभवी सनदी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व्हावे या उद्देशातून हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे रोटरी क्लब डोंबिवली पूर्वचे अध्यक्ष विजय डुंबरे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये जमीन व्यवहारात मुंबईतील विकासकाची २२ लाखाची फसवणूक

डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी मधील पेंढरकर महाविद्यालया समोरील रोटरी भवन मध्ये संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक तरुणांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव सनदी लेखापाल एस. गायथ्री यांनी केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:20 IST
Next Story
कल्याणमध्ये जमीन व्यवहारात मुंबईतील विकासकाची २२ लाखाची फसवणूक