अधिकृत अल्पबचत एजन्सी

राज्य सरकारने अनेक अल्पबचत योजना तयार केल्या आहेत, त्यामुळे महिलांना व बेरोजगारांना रोजगार मिळाला.

*राज्य सरकारने अनेक अल्पबचत योजना तयार केल्या आहेत, त्यामुळे महिलांना व बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यामुळे महिलांनी विविध योजनांच्या एजन्सी घेतल्या. मात्र ही एजन्सी घेताना सरकारकडून अधिकृत परवाना घ्यावा लागतो.
*हा परवाना मिळविण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रात अर्ज करू शकता.
*ज्यांच्या नावावर एजन्सी घेणार आहात, त्यांच्या नावे २००० रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
*विहित नमुन्यातील करारनामाही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
*या करारनाम्यात दोन जामीनदारांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.
*राजपत्रित अधिकाऱ्याने दिलेली चारित्र्याची प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
*अर्जदार स्वत: किंवा त्याच्या कुटुंबीयांपैकी कुणी राज्य वा केंद्र सरकारी नोकरीस असल्यास त्याचे शपथपत्र जोडणे आवश्यक.
*सर्व कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतर त्याची छाननी होते आणि किमान सात दिवसांत एजन्सी द्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जातो.
*एजन्सी मिळविण्यासाठी http://www.thane.nic.in या संकेतस्थळावर अर्जाचे नमुने मिळवू शकता.tv18

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Legal saving agency

ताज्या बातम्या