ठाणे :  करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आलेले कोकण मराठी साहित्य परिषदचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन येत्या १२ आणि १३ एप्रिल रोजी होणार आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात होणाऱ्या या दोनदिवसीय संमेलनाची सुधारित कार्यक्रमपत्रिका आणि अन्य तपशील लवकरच जाहीर करण्यात येतील, अशी माहिती कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.

जानेवारी महिन्यात कोमसापचे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या र्निबधामुळे हे संमेलन पुढे ढकलण्यात आले होते. सद्य:स्थितीला करोनाचे र्निबध शिथिल झाल्याने हे साहित्य संमेलन १२ आणि १३ एप्रिल रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात होणार आहे. नुकतेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झालेले प्रणव सखदेव संमेलनाच्या अध्यक्षपदी तर स्वागताध्यक्षपद ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के भूषविणार आहेत. विविध साहित्यिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील कार्यक्रम, परिसंवाद, मैफिली अशा सत्रांचा समावेश असणारी सुधारित कार्यक्रमपत्रिका कोमसापकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीकडे पत्रांद्वारे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी कोमसापकडून सुरू करण्यात आलेली पत्रमोहीम विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आदी ठिकाणी राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर युवा साहित्यप्रेमींना नावनोंदणीसाठी कोमसापकडून आवाहन करण्यात येत आहे.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
marathi sahitya sammelan, Delhi,
यंदा साहित्य संमेलनाचा मांडव थेट दिल्लीत? महामंडळाच्या बैठकीत जे ठरले….
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?