कल्याण – दाट धुक्याची चादर तयार झाल्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील कसारा, खोपोली, कर्जत ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकल सोमवारी सकाळी अर्धा तास उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. लोकल चालविताना मोटरमनला पाच फुटाच्या पलीकडील दिसत नाही. त्यामुळे दर्शनी भागातील प्रखर झोत दिवे लावून भोंगा वाजवत मोटरमन संथगतीने लोकल चालवित असल्याचे दृश्य आहे.

मध्यरात्रीपासून दाट धुके पडण्यास सुरुवात झाली. सकाळच्या वेळेत हे धुके ओसरेल असे वाटले असतानाच, सकाळचे आठ वाजून गेले तरी धुक्याची चादर कायम होती. शहरांमधील इमारती धुक्यात गायब झाल्या होत्या. पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडणारे नागरिक धुक्याचा आनंद घेत होते. शाळकरी मुले पालकांसोबत धुक्यातून वाट काढत शाळेत जात होती.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Mumbai Local News
Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन, “ट्रेनमध्ये अडकून पडला असाल तर…”
Central Railway
Central Railway : आता फुकटात एसी किंवा फर्स्ट क्लासने प्रवास करणं पडणार महागात; मध्य रेल्वेनं घेतला ‘हा’ निर्णय!
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
Akshay Shinde Shot Dead Badlapur Sexual Assault Case Amit Thackeray Remark
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेंच्या एन्काउंटरवरून अमित ठाकरेंच्या पोस्टने वेधलं लक्ष; फडणवीसांसह विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न
mumbai heavy rain local down
“माझ्या बाळाला जेवण भरवायचं आहे, प्लीज लोकल सुरू करा”, स्टेशनवर खोळंबलेल्या महिला प्रवाशाची मोटरमनला कळकळीची विनंती!
central railway cancelled 10 ac local service
मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द

हेही वाचा >>>ठाणे : वृद्धेची कोट्यवधी रुपयांना फसवणूक

सोमवार कामावर जाण्याचा पहिला दिवस असल्याने कार्यालयात वेळेत पोहचू या विचाराने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कसारा, कर्जत, आसनगाव, मुंब्रा, अंबरनाथ, बदलापूर रेल्वे स्थानकात आलेल्या प्रवाशांचा हिरमोड झाला. नेहमीच्या निश्चित वेळेपेक्षा लोकल धुक्यामुळे अर्धा तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे रेल्वे स्थानकात येणारी मिळेल ती लोकल पकडून नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने प्रवास करत होता. लोकल उशिरा धावत असल्याने रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांच गर्दी उसळली होती.

मुंबईकडून कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल संथगती धावत होत्या. लोकलच्या दरवाजात उभे राहून अनेक प्रवासी धुक्याच्या चादरीमध्ये लपेटून जाण्याचा आनंद घेत होते.

हेही वाचा >>>गणेश मुर्ती मोडतोडीनंतर भिवंडीत तणाव

मेल, एक्सप्रेस गाड्यांचा वेग धुक्यामुळे कमी झाल्याने या गाड्या खडवली, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात मुख्य रेल्वे मार्गाजवळील बाजुच्या रेल्वे मार्गात उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. डोंगर, दरी असलेल्या कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, बदलापूर, आसनगाव, खर्डी परिसरात धुक्याचा प्रभाव सर्वाधिक होता. दाट धुक्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याच्या सूचना प्रत्येक रेल्वे स्थानकात देण्यात येत होत्या.

साडे आठ वाजल्यानंतर धुक्याची चादर कमी होऊ लागली. त्यानंतर रेल्वे स्थानकात लोकल निश्चित वेळेत धावत असल्याच्या वेळ इंडिकेटरवर लावण्यात येऊ लागल्या. तरीही या लोकल पाच ते दहा मिनिटे उशिरानेच धावत होत्या.