local train pujan by passengers at Dombivali and Kalyan railway station On the occasion of dasara | Loksatta

दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन

दुसऱ्यानिमित्त बुधवारी कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे एक दिवस अगोदरच प्रवाशांनी लोकलचे पूजन केले.

दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात लोकल पूजन
दसऱ्यानिमित्त प्रवाशांकडून लोकलचे पूजन

दररोज आपल्या कामाची ठिकाणी कधी वेळेत तर कधी उशिरा घेऊन जाणाऱ्या नेहमीच्या लोकलची डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी झेंडुंच्या फुलांच्या माळा, लोकलमध्ये आरती, भजने गाऊन प्रवाशांनी पूजा केली.

हेही वाचा- बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा

दुसऱ्यानिमित्त बुधवारी कार्यालयांना सुट्टी असल्याने लोकल प्रवास होणार नसल्याने प्रवाशांनी दसऱ्याच्या आदल्या दिवशी लोकलची अन्नदाती या भावाने पूजा केली. प्रत्येक डब्यातील प्रवासी लोकलच्या खिडक्या, दरवाजे यांना फूलमाळा लावण्यात दंग होते. डब्यामध्ये चारही बाजुने झेंडुच्या फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

लोकलच्या मोटारमनची गंध, अक्षता लावून अन्नदातेचा चालक म्हणून पूजा करण्यात आली. लोकलच्या दोन्ही बाजुच्या दर्शनी भागात फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. आपण आपल्या घरात पूजा करतोय अशा भावनेतून प्रवासी लोकल सजविण्याच्या कामात सकाळी व्यग्र होते.
लोकल सजावट झाल्यानंतर लोकल समोर, डब्यात नारळ वाढवून, पेढे वाटून दसऱ्याचा आनंद साजरा करण्यात आला. महिला डब्यातही महिला उत्साहाने या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. लोकल सुरू होताच देवीच्या आरत्यांना वाजत गाजत सुरूवात करण्यात आली. सीएसएमटी येईपर्यंत प्रवासी देवीचा जागर करत, भजने करत प्रवास करत होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
VIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा

संबंधित बातम्या

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
बदलापूर: रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली; नागरिकांत संताप
ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया
“मी मुंब्र्यात गेल्यापासून दोनदा अतिरेकी…” म्हणणाऱ्या आव्हाडांना मनसेनं फटकारलं; म्हणाले, “किती घटना घडायला हव्या होत्या, मग तुम्हाला…”
Video : “रश्मी ठाकरेंनी देवीसमोर शक्तीप्रदर्शन करून…”, शिंदे गटाचा खोचक टोला; बाहेरून गर्दी आणल्याचा दावा!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी शिवभक्त म्हणूनच सांगोतय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन
विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?
Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…
“…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक
शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”