गुन्हे वृत्त : पित्याचा मुलीवर लैंगिक अत्याचार

मुलीने आईला दिल्यावर गुरूवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai's Saki Naka , 24 yr old man allegedly beaten to death over suspicion of mobile theft , Crime , Police, Loksatta, Loksatta news, marathi, Marathi news
( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भिवंडी येथील शांतीनगर भागात बुधवारी नसीरुद्दीन आब्दूलमजीद अन्सारी (३८) याने स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी  शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीनगर येथील पिराणीपाडा परिसरात राहणाऱ्या नसीरुद्दीन आब्दूलमजीद अन्सारी याने त्याच्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पिडीत मुलीची आई घरात नसताना नसीरुद्दीन हा तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असे. याची माहिती मुलीने आईला दिल्यावर गुरूवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळव्यात तरुणीवर लैंगिक अत्याचार

ठाणे : कळवा पूर्व येथे एका १८ वर्षीय तरुणीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कृपाशंकर शर्मा (२२) याच्याविरोधात बुधवारी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत तरुणी घरात एकटी असताना शेजारी राहणाऱ्या कृपाशंकर याने महत्वाचे काम आहे असे सांगून तिला घरी बोलावले. तरुणी कृपाशंकर याच्या घरी गेली असता, त्याने तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

१६ वर्षीय मुलीचा विनयभंग

ठाणे :  विठ्ठलवाडी येथील गंगाराम शाळेजवळ सहा मुलांनी एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलगी ही तिच्या भावाला शाळेतून घरी नेण्यासाठी गेली असता, हृतिक गंगावणे याने तिचा हात खेचून तिचा विनयभंग केला. तसेच हृतिक याचे मित्र अनिकेत खंडागळे, हृतिक पवार, हैदर मन्सुरी, सागर गंगावणे, सुरज खंडागळे यांनी मुलीवर अश्लिल शेरेबाजी केली. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडीच लाखांची चोरी

ठाणे :  खडकपाडा येथील शिवाजी नगर परिसरात गुरूवारी चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर येथील राम समर्थ हाऊसमध्ये राहणाऱ्या मिथलेस मिश्रा या घरात नसताना चोरटय़ांनी त्यांच्या घरातील कपाटाचे कूलूप तोडून त्यांच्या घरातील अडीच लाख रुपयांचे सोने चोरी केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोर अटकेत

ठाणे : नौपाडा येथील राममारुती रोड भागात बुधवारी पाणी मागण्याची बतावणी करुन घरात प्रवेश मिळवून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजु गोतरणे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. राम मारुती रोड येथील अरहत सोसायटीमध्ये ८४ वर्षीय वृद्ध महिला राहतात. बुधवारी राजु याने त्यांच्या घरी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर त्याने घराची कडी लावून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. राजू चोरीच्या प्रयत्नात असताना शेजाऱ्यांना त्याची चाहूल लागली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta crime news part

ताज्या बातम्या