नारळाचा पदार्थ बनवा आणि आकर्षक बक्षिसे जिंका; अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकरची उपस्थिती

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ हा वार्षिकांक गेल्या पाच वर्षांत वाचकप्रिय बनला आहे. किनाऱ्यावरील राज्यांच्या खाद्यसंस्कृतीत नक्की काय दडलंय हे सांगणाऱ्या यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’चे प्रकाशन आज होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित खास पाककृती स्पर्धेत आज दुपारी १२ वाजेपर्यंत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. प्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे आणि अभिजीत खांडकेकर यांची खास उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

नऊ राज्यांतील खाद्यसंस्कृतीची उत्तम जाण असणाऱ्या लेखिकांनी एकेका राज्यातील महत्त्वाच्या पदार्थाचा परिचय करून दिला आहे. अशा ‘पूर्णब्रह्म’च्या या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना मिळणार आहे, एक संधी आपली पाककला सादर करण्याची. नारळाचा कोणताही एक गोड पदार्थ घरी बनवून आणून सादर करायचा आहे. अशा रीतीने आपण या स्पर्धेत सहभागी होऊ शकता आणि जिंकू शकता आकर्षक बक्षिसे तुमच्या आवडत्या कलाकारांच्या हस्ते. फक्त स्त्रियांनाच आपली पाककला सादर करता येईल असे नव्हे तर पुरुषांनाही आपली पाककला या स्पर्धेत सादर करता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी आज, २२ ऑगस्टला दुपारी १२ वाजेपर्यंत करता येणार आहे. आपली नावे ०२२-६७४४०३४७/३६९ या क्रमांकावर दूरध्वनी करून नोंदवता येईल.

प्रायोजक

प्रायोजक – तन्वी हर्बल, सह प्रायोजक  श्री धूतपापेश्वर, बँकिंग पार्टनर अपना बँक, पॉवर्ड बाय किंजीन फूड्स प्रा. लि., के. के. ट्रॅव्हल्स, आनंदकुमार जीवन मार्गदर्शन, हेल्थकेअर पार्टनर होरायझन हॉस्पिटल.

पूर्णब्रह्म प्रकाशन सोहळा

* कुठे ? – हॉटेल टिप-टॉप प्लाझा, ठाणे</p>

* कधी? – २२ ऑगस्ट, संध्याकाळी ६ वाजता.