मनसोक्त खरेदीवर बक्षिसांची लयलूट

१४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

आजपासून ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे चौथे पर्व

खरेदीच्या आनंदाबरोबरच नागरिकांना दररोज आकर्षक पारितोषिके मिळवून देणाऱ्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’चे चौथे पर्व मंगळवार, २४ जानेवारीपासून सुरू होत आहे. या खरेदी उत्सवात ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याण परिसरातील शंभराहून अधिक गृहपयोगी वस्तूंचे शो रूम्स सहभागी झाले आहेत.

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये’ सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दररोज सुवर्णमुद्रा, चांदीचे नाणे, एलईडी टीव्ही, फ्रिज, पैठणी साडी, गिफ्ट कूपन अशी आकर्षक पारितोषिके जिंकता येणार आहेत. महोत्सवाच्या अखेरीस सोडतीद्वारे पहिल्या भाग्यवान ग्राहकाला कार व दुसऱ्या विजेत्याला केसरी टुर्सकडून सहलीचे पॅकेज यांसारखी पारितोषिके दिली जाणार आहेत. १४ फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

वीकेण्ड आणि सेकंड होम्समधील नामांकित ‘सॉफ्ट कॉर्नर’ हे या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक असून पितांबरी हे सहप्रयोजक आहेत. ट्रॅव्हल पार्टनर केसरी, बॅकिंग पार्टनर युनियन बँक, वेलनेस पार्टनर यू आर फिटनेस्ट त्याचबरोबर टीप टॉप प्लाझा, कलाकृती, ऑरबिट हे असोसिएट पार्टनर आहेत. वामन हरी पेठे सन्स, प्रशांत कॉर्नर, मॅक्रो फाइन हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. तसेच सरलास्, ओमकार किचन वर्ल्ड, राजदीप इलेक्ट्रॉनिक, कलानिधी, एस.कुमार गोल्ड अ‍ॅण्ड डायमंड हे या फेस्टिव्हलचे गिफ्ट पार्टनर आहेत.

महोत्सवात सहभागी होऊ  इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क : अतुल जोशी- ९८२१४७५९१९, प्रवीण भंडारे- ९८१९९९५४६६, कृष्णा नागरे-९८३३१४७८७१, राहुल पंडित- ९८७०००४९४४

कसे सहभागी व्हाल?

* लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

* सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

* ते  कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

* अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.

* ‘ड्रॉपबॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज एका भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल व त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’मधून प्रसिद्ध केले जाईल.

* ‘लोकसत्ता’च्या खरेदी योजनेत उपरोक्त तिन्ही शहरांतील दुकानदारांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो.

*अटी-शर्ती लागू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta thane shopping festival started