scorecardresearch

लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचा बक्षीस सोहळा उत्साहात संपन्न

प्रसिद्ध अभिनेते – निर्माते मंगेश देसाई यांची शॉपिंग फेस्टिवलला हजेरी

Loksatta Thane Shopping Festival, award ceremony , Celebrity, participants
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलचा बक्षीस सोहळा उत्साहात संपन्न ( Image – लोकसत्ता टीम )

ठाणे : लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टीव्हला मोठया उत्साहात सुरुवात झाली असून ठाणेकरांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या फेस्टिवलमधील २५ जानेवारी ते २९ जानेवारी या दिवसात सहभागी झालेल्या २५ भाग्यवान विजेत्यांना सोने – चांदीची नाणी, घड्याळ, ब्लूटूथ हेडसेट, साडी आणि गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके शनिवारी टीप टॉप प्लाझा चे रोहित भाई शाह, स्मिता शाह आणि लागू बंधूचे प्रशांत रोकडे यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आली. यावेळी लोकसत्ता चे महेंद्र धारवटकर आणि नीलिमा कुलकर्णी उपस्थित होते. तसेच शुक्रवारी झालेल्या शॉपिंग फेस्टिव्हल मध्ये प्रसिद्ध अभिनेते – निर्माते मंगेश देसाई यांनी हजेरी लावली होती. यावेळी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेले दुकानदार आणि खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांशी मंगेश देसाई यांनी संवाद देखील साधला. ठाणे महापालिकेचे सहकार्य लाभलेल्या लोकसत्ता ठाणे आयोजित शॉपिंग फेस्टिव्हल १४ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. या दरम्यान सहभागी ग्राहकांना विविध बक्षिसांची लयलूट करता येणार आहे.

‘लोकसत्ता’ आयोजित ठाणे शॉपिंग फेस्टिवलला २५ जानेवारीपासून मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली आहे. या फेस्टिवलमधील प्रत्येक दिवशीच्या भाग्यवान विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येत असून त्यासाठी सिनेकलावंत उपस्थिती लावत आहेत. त्यामुळे या स्पर्धेविषयी आणि पारितोषिक वितरण सोहळ्याविषयी स्पर्धकांमध्ये कुतूहल असल्याचे दिसून येते. या फेस्टिवलमधील २५ जानेवारी ते २९ जानेवारी या पाच दिवसांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी ठाण्यातील टिप टॉप प्लाझाच्या सभागृहात पार पडला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या टीप टॉप प्लाझा चे रोहित भाई शाह, स्मिता शाह आणि लागू बंधू चे प्रशांत रोकडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. त्या वेळी विजेत्या स्पर्धक, त्यांचे नातेवाईक आणि अन्य स्पर्धक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. स्पर्धकांना सोने चांदीची नाणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून येत होते. यंदाच्या फेस्टीवलला सुरुवात झाली असून विविध दुकानदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला आहे. हा उत्सव २५ तारखेपासून सुरू झाला असून १४ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यात सहभागी झालेल्या नागरिकांना आकर्षक अशा विविध भेटवस्तू मिळणार आहेत. तर या उत्सवाच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून भाग्यवान विजेत्याला आकर्षक आणि मोठी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ला मुख्य प्रायोजक – सॉफ्ट कॉर्नर, सहप्रायोजक – क्रेडाई – एमसीएचआय ठाणे, ठाणे महानगर पालिका, सहाय्य – टीजेएसबी सहकारी बँक लि., वीणा वर्ल्ड, पितांबरी प्रॉडक्ट प्रा.लि., पीएनजी ज्वेलर्स, पॉवर्ड बाय – आर के बाजार, शुभकन्या, उषा एजन्सी, वागड्स, टीप टॉप प्लाझा, कडली, अनंत हलवाई, प्रशांत कॉर्नर, राजघराना, डॉ. गाडगीळ आय केअर, रेमंड शॉप, द पटेल साडी, नागरिक फॅशन टॉवर, रुप संगम, रेमंड तलावपाळी, गोल्ड पार्टनर- लागू बंधू, बँक्वेट पार्टनर – आय-लीफ बँक्वेट्स, गिफ्ट पार्टनर – रतनशी खेराज साडी, प्रथम बजाज, मॅक एंटरप्रायझेस, श्रीजी फोन्स यांचे सहकार्य लाभले आहे.

कसे सहभागी व्हाल?

लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळेल.सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिलासह कूपन दिले जाईल. ते कूपन भरून दुकानातील ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.अर्धवट माहिती भरलेली कूपन फेटाळले जातील.‘ड्रॉपबॉक्स’मध्ये जमा होणाऱ्या कूपनमधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ मधून प्रसिद्ध केले जाईल.या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.या महोत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या दुकानदारांनी अधिक माहितीसाठी संपर्क : कृष्णा नागरे- ९८३३१४७८७१, गोविंद भोसले- ९८१९८१४२५३ येथे संपर्क साधावा. तर दररोज ड्रॉप बॉक्समधून कुपन्स संकलित करून ठाणे लोकसत्ता कार्यालयात आणण्यात येत आहेत. त्यातून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाणार आहे. प्रत्येक भाग्यवान विजेत्याची नावे ‘ठाणे वृत्तान्त’मधून प्रसिद्ध केली जातील.

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश देसाई

प्रसिद्ध अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी शुक्रवारी ठाण्यातील मॅक एंटरप्रायझेस (स्टेशन रोड, ठाणे), रेमंड शॉप (तलावपाळी, ठाणे), प्रथम बजाज (पाचपाखडी, ठाणे), प्रशांत कॉर्नर (पाचपाखाडी, ठाणे) या दुकानांना भेट दिली आणि खरेदीचा आनंद घेतला. यावेळी दुकानांमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या निमित्ताने वेगवेळ्या दुकानांमध्ये जाता आलं. खरतर हि दुकाने येता जाता नेहमी दिसत असतात मात्र आज लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमुळे कळालं हि दुकाने अनेक वर्षांपासून आहे आणि त्यांचा एक वेगळा इतिहास देखील आहे. ठाण्यात अशी दुकान आहे याचा अभिमान देखील वाटतो. त्याच बरोबर या उपक्रमासाठी लोकसत्ताचे आभार देखील मानले. तसेच एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद होणे गरजेचे आहे, हे प्लास्टिक शरीराला खूप घातक आहे. २०५० पर्यंत जर अशीच परिस्थिती राहिली तर एका घरातील एका व्यक्तीला कर्करोग आणि त्याच घरातील व्यक्तीला व्यंधत्व येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद करून सरकारने सांगितलेल्यानुसार ५० मायक्रॉन वरील प्लॅस्टिकचा वापर करावा असा संदेश मंगेश देसाई यांनी लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने दिला.

२५ जानेवारी ते २९ जानेवारीचे विजेते

१) अथर्व पंडित
२) विष्णू चौधरी
३) सुमुख सातवळेकर
४) नंदकुमार सकपाळ
५) अभिराज महाजन
६) प्रतीक गुरव
७) औदुंबर कोकरे
८) कोमल आंबवले
९) कृष्णा देवळेकर
१०) चिन्मय अभ्यंकर
११) जगन्नाथ घाणेकर
१२) संतोष नायकर
१३) स्वप्ना रानडे
१४) हर्षल चव्हाण
१५) भावेश वाघेला
१६) प्रिती बेदरकर
१७) स्मिता जाधव
१८) ज्योती सरवडे
१९) मनिषा सोमण
२०) प्रांजली कालेकर
२१) स्वप्नील जंगले
२२) योगेश जावळे
२३) जनार्धन बागुल
२४) कविता दोंडे
२५) अनिरुद्ध चौधरी

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 12:20 IST
ताज्या बातम्या