तपासणी यंत्र, सुरक्षा रक्षकांना चकवत बंदुकीची बॅग मॉलमध्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विवियाना मॉलची सुरक्षा व्यवस्था तकलादू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांनी रविवारी विवियाना मॉलमध्ये त्यांची बंदूक एका बॅगमधून तपासणीसाठी पाठवली. परंतु, तेथे बसविण्यात आलेल्या तपासणी यंत्राने बॅगमध्ये बंदूक असल्याची सूचना दिली नाही आणि सुरक्षारक्षकांनीही ती बॅग तपासली नाही. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, या प्रकारामुळे मॉलममध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मॉलची सुरक्षा व्यवस्था चोख असल्याचा दावा करत रविवारी घडलेल्या प्रकाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे मॉल व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loops in thane viviana mall security system
First published on: 03-04-2017 at 05:13 IST