ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू ठरलेल्या कोपरी पूलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यामुळे मुंबई- ठाण्याच्या वेशीवर असलेल्या या पूलावर सकाळी आणि रात्रीच्यावेळेत होणाऱ्या कोंडीतून ठाणेकरांची सुटकाझाली आहे. मागील चार वर्षांपासून पूलाचे काम सुरू होते. तांत्रिक अडचणी, करोनाकाळामुळे हे काम रखडले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवली कुंभारखाण पाड्यातील हरितपट्ट्यातील बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे आयुक्तांचे आदेश

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ पदरी आहे तर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे पुलामुळे सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. ही वाहतूक कोंडीची सोडविण्यासाठी प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाले असून आता चार-चार पदरी मार्गिका वाहन चालकांसाठी उपलब्ध झाली. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याच्या दृष्टीने ठाणे शहरातील कोपरी येथे २+२ पथ मगिकेच्या रेल्वे ओलंडणी पुलाचे ४+४ मार्गिका असे रुंदीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएमार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून या भागाच्या बांधकामाकरीता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७४८ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील रस्त्यांची दुरवस्था

या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेज पर्यंत महामार्गा खालून वाहानांच्या रहदारीकरीता २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.१ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे. प्रस्तावित नवीन कोपरी स्थानकाला जोडणारा वाहनांसाठी भुयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्या पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे. “कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत ( पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस. व्ही. आर. श्रीनिवास म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra cm eknath shinde inaugurates new kopri bridge in thane zws
First published on: 09-02-2023 at 15:24 IST