scorecardresearch

Premium

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप, संपाची नोटीस देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप ४ डिसेंबरपासून पुकारण्यात आला आहे.

Maharashtra wide strike Anganwadi employees
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप, संपाची नोटीस देण्यासाठी ठाणे जिल्ह्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

ठाणे – अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्तीवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने महाराष्ट्रव्यापी बेमुदत संप ४ डिसेंबरपासून पुकारण्यात आला आहे. यासंबंधीचे नोटीस देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात ही नोटीस दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे ग्रॅच्यूईटी मिळण्यास पात्र आहेत. परंतु, दोन वर्षे उलटून गेले तरी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिना अर्ध्या मानधनाएवढी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. तसेच अंगणवाडी केंद्रातील बालकांना पूरक पोषण आहाराकरिता देण्यात येणाऱ्या रक्कमेत वाढ करावे, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मोबाईल देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ४ महिन्यांपूर्वी दिला आहे. परंतु, राज्य सरकारमार्फत अंगणवाडी सेविकांना अद्याप मोबाईल दिलेले नाही. या मागण्यांसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.

electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…
Pm modi meeting at Yavatmal
यवतमाळ : पंतप्रधानांची सभा, रस्ते बंद, विद्यार्थ्यांची गैरसोय…
There is a threat of disruption of electricity supply in the state due to the agitation of the contractual electricity workers
राज्यातील वीज पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका!; कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र
राज्यातील पाच हजार एसटी बस डिझेलऐवजी एलएनजीवर धावणार; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

हेही वाचा – ठाणे : दिव्यात ठाकरे गटाचा प्रभाग समितीवर मोर्चा, पाणीटंचाई समस्या दूर करण्याची मागणी

हेही वाचा – डोंबिवलीतील वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या जिवाला भूमाफियांकडून धोका

यासंदर्भातील नोटीस ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्री कार्यालयात देण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी शुक्रवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. यावेळी शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन बेमुदत संपाची नोटीस दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra wide indefinite strike of anganwadi employees anganwadi workers march in thane district to give notice of strike ssb

First published on: 01-12-2023 at 18:56 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×