scorecardresearch

डोंबिवलीत गृहसेविकेने घर स्वच्छता करताना सोन्याचा ऐवज चोरला

डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात ही घटना घडली आहे.

gold-silver rates today
आजचा सोने-चांदीचा भाव (संग्रहित छायाचित्र)

डोंबिवली– डोंबिवलीत घर स्वच्छतेसाठी आलेल्या गृहसेविकेने आणि तिच्या जोडीदारणीने घऱातील दिव्यांग महिलेला अंधारात ठेऊन घरातील कपाटात ठेवलेल्या ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लांबविला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात ही घटना घडली आहे.

साईज्योती संतोष गवारे (रा. शेलार नाका, डोंबिवली), गिता (साईज्योतीची मावशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या गृहसेविकांची नावे आहेत. वैभव विजय पंडितराव (३२, रा. पांडुरंगवाडी, मानपाडा रस्ता, डोंबिवली) अशी तक्रार करणाऱ्या रहिवाशाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव पंडित हे औषधोपचरासाठी एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात वैद्यकीय कामासाठी गेले होते. त्यांच्या घरात आई आहे. त्या दिव्यांग आहेत. वैभव यांच्या घरी शेलार नाका येथे राहणारी त्यांची नेहमीची गृहसेविका मुक्ता गवारे या काही कारणाने येऊ शकल्या नाहीत. पंडित कुटुंबीयांची घर स्वच्छते संदर्भात अडचण येऊ नये म्हणून मुक्ता गवारे यांनी आपली नात साईज्योती आणि तिची मावशी गीता यांना पंडित यांच्या घरी घर कामासाठी पाठविले. गिताने हिने घरातील भांडी घासली. साईज्योतीने हिने घरात झाडू मारला. लादी पुसत असताना साईज्योतीने एका खोलीत कुलूप न लावलेले कपाट वैभव यांच्या दिव्यांग आईला कळू न देता हळूच उघडले. कपाटाच्या एका खणातील डब्यात ठेवलेले ४० हजार रुपयांचे दागीने काढून घेतले.

झाडलोट झाल्यावर दोघी चोरलेले दागीने घेऊन निघून गेल्या.

वैभव पंडित घरी आले तेव्हा त्यांनी घरातील कपाट पाहिले. त्यांना डब्यातील सोन्याचे दागीने चोरीला गेल्याचे दिसले. घरात आई असताना कोणीही बाहेरुन आलेले नाही. अशा परिस्थितीत दागीने चोरीला गेल्याने पंडित कुटुंबीयांनी गृहसेविकांवर संशय व्यक्त केला. त्याप्रमाणे पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास करून साईज्योती, गीता यांची चौकशी केली. तपासानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maid theft gold worth rupees 40 thousand in dombivli zws