ठाणे : ठाण्यातील राम मारुती रोडवर असलेल्या मॅजेस्टिक बुक डेपोच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनाच्या कार्यक्रमास आज, शनिवार पासून सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दि‌वशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांची मुलाखत मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. ठाण्यातील राम मारुती रस्त्यावर सन १९९७ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर मॅजेस्टिक ग्रंथदालन सुरु झाले. सुसज्ज आणि प्रशस्त असलेल्या या ग्रंथदालनास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदा या ग्रंथदालनास २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मॅजेस्टिकतर्फे मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा कार्यक्रम ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात १ ॲाक्टोबर ते ५ ॲाक्टोबर या कालावधीत सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक दामोदर मावजो यांची मुलाखत होणार आहे. कार्यक्रमाचा दुसरा दिवस, २ ॲाक्टोबर रोजी दशकातले लेखक गणेश मतकरी आणि ह्रषीकेश गुप्ते यांची मुलाखत पार पडणार आहे. आजच्या काळात समाज माध्यमांचा वापर वाढला असून काहीजण या माध्यमांर्फत आपला व्यवसाय देखील करत आहे. या समाजमाध्यमातील फेसबुक माध्यमावर तयार करण्यात येणारा समुह काय काय करतात याची माहिती ठाणेकर नागरिकांना ३ ॲाक्टोबर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.

हेही वाचा : पालिकेचे नियम कर्मचाऱ्यांच्या शिस्तीसाठी पण, त्रास मात्र सर्वसामान्य ठाणेकरांना

वाचनवेडा समुहाचे विनम्र भाबळ, मुंबई स्वयंपाकघरच्या भक्ती चपळगावकर आणि सिनेमा गल्लीचे गुरुदत्त सोनसुरकर हे उपस्थितांना या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तर, ४ ॲाक्टोबर रोजी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ५ ॲाक्टोबर रोजी गायक सुदेश भोसले यांची मुलाखत पार पडणार आहे. या सर्व कार्यक्रमात प्रेक्षकांना विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या पाच दिवसाच्या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत वाचकांसाठी ग्रंथप्रदर्शनही भरविण्यात आले आहे, अशी माहिती मॅजेस्टिकमार्फत देण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majestic talks and book exhibition program starts from today majestic book depo in thane news tmb 01
First published on: 30-09-2022 at 16:39 IST