डोंबिवली- टिटवाळ्या जवळील आपटी गावात एका शेतघरात रखवालदाराचे काम करणाऱ्या एका मद्यपीने रागाच्या भरात गुरुवारी रात्री पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली. बाळु दुटे (३८) असे आरोपीचे नाव आहे. टिटवाळा पोलसांनी त्याला अटक केली आहे. टिटवाळा जवळील आपटी गाव परिसरात बिंदुसरा शेतघर आहे. या शेतघराच्या रखवालदारीसाठी शेतघर मालकाने बाळु दुटे (रा. शेलविरे, अकोले, जि. नगर) आणि त्याची पत्नी शेतघराच्या देखभाल आणि मजुरी कामासाठी ठेवले आहे.

हेही वाचा >>> उल्हासनगरः व्हाट्सअपवरून राष्ट्रवादी – रिपाइं कार्यकर्त्यांमध्ये राडा; रिपाइं कार्यकर्त्यांनी कलानी महलमध्ये शिरून केला हल्ला

Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”
Solapur, Moneylender, Hires Hitmen, firing on Businessman, Recover Overdue Loan, crime news, marathi news, police,
सोलापूर : कर्जवसुलीसाठी व्यापाऱ्यावर गोळीबार; सावकाराने सुपारी देऊन केला खुनीहल्ला

बाळुला दारुचे व्यसन आहे. त्याचे पत्नी उषा (३१) हिच्या बरोबर किरकोळ कारणावरुन भांडण होत होते. गुरुवारी रात्री बाळू आणि उषा यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. बाळूने मद्यपान केले असल्याने त्याने रागाच्या भरात शेतघरावर लाकूड तोडकामासाठी आणलेली कुऱ्हाड घेऊन पत्नीवर वार केले. दोघेच जण शेतघरात असल्याने पत्नी उषाला वाचविण्यासाठी कोणी पुढे आले नाही. हत्येनंतर पती बाळू पळून गेला. आपटी ग्रामस्थांना ही माहिती मिळताच त्यांनी टिटवाळा पोलिसांना कळविले. पोलिसांनी रात्रीतून शोध घेऊन फरार बाळुला अटक केली आहे. उषाचा भाऊ दत्तू परते यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.