ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या वेळू गावात एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे. चविष्ट जेवण न दिल्याच्या कारणातून आरोपीनं आपल्या ५५ वर्षीय आईचा जीव घेतल्याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, मुरबाड तालुक्यातील वेळू गावात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. घरगुती कारणावरून आरोपीचे आपल्या आईबरोबर वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी रविवारी आरोपीचं त्याच्या आईशी पुन्हा भांडण झालं. आईने चविष्ट जेवण बनवलं नसल्याच्या कारणातून त्याने आईशी वाद घातला.

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Brutal killing of daughter along with wife in Buldhana
खळबळजनक ! पत्नीसह कन्येची निर्घृण हत्या; मारेकऱ्याने स्वत:ही घेतली विहिरीत उडी…
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी तरुणाने रागाच्या भरात आपल्या आईच्या मानेवर विळ्याने वार केला. या हल्ल्यात ती जागीच कोसळली आणि मरण पावली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा- नाशिक: बापानेच लेकाच्या जीवाचा केला सौदा, पालखेड धरण परिसरातील हत्येचं गूढ उलगडलं

या धक्कादायक प्रकार उघडकीस येताच शेजारच्या काही लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. आईचा खून केल्यानंतर आरोपीने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अद्याप त्याला अटक केली नाही, असंही अधिकाऱ्याने सांगितलं. सोमवारी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.