ठाणे : ऐरोलीत नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील फडणवीस आणि आमदार मंदा म्हात्रे यांचा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला आहे. या फोटोमुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले आहे. हा फोटो वायरल झाल्यानंतर मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच मला विश्वास देतात की, ते माझ्यासोबत आहेत…हा विश्वास माझ्यासाठी खूप मोठा आहे,’असे मंदा म्हात्रे म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी माझ्या मुलाप्रमाणे मानते.मला सभागृहात सगळेच आमदार आजी म्हणतात. परंतू, मुख्यमंत्री फडणवीस नेहमीच मानाने आई म्हणतात. त्यात फार आपुलकीच नात आहे जस आई आणि मुलाचे असते. ऐरोलीत सभेला जेव्हा ते आले तेव्हा मी उभी होती तर, लगेच ते माझा हात पकडून मला घेऊन आले. यातून आमच्यात असलेली आपुलकीचा त्यांनी नवी मुंबईलाही दाखवून दिली, असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले. ते जेव्हा विरोधी पक्ष नेता होते, त्यावेळी मी त्यांना धीर द्यायची. ते खूप हूशार आहेत आणि त्यांना विश्वास आहे की मंदा म्हात्रे कधी खोट सांगणार नाही. ही विश्वासहर्ता मिळवण्यासाठी मला खूप श्रम करावे लागले आहेत, असेही त्या म्हणाल्या.
‘माझ्याबद्दल कोणी जाऊन सांगितले ना त्यांना तर ते कधीच खरं मानणार नाही. नुकतेच नवी मुंबईत रवी चव्हाण बोलले जोपर्यंत देवेंद्र फडणीस आहेत तोपर्यंत मंदा म्हात्रे यांना कोणी हात लावू शकत नाही. म्हणजे आमच्या नेत्यांना पण सगळ्यांना माहिती आहे. की देवाभाऊंचा माझ्यावर किती विश्वास आहे. मी ज्या पक्षात राहिले आहे त्या पक्षात निष्ठेने काम केले आहे, असे मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
२०१४ मध्ये माझ्या पाठीशी कोणी नव्हते. पवारांनी देखील माझ्या हात सोडला होता. त्यावेळी फडणवीस यांनीच मला तिकीट दिली. मला तिकीट देण्यावरुन बऱ्याच जणांनी विरोद दर्शवला होता. परंतू, फडणवीस यांनी सर्वांना एकच उत्तर दिले की त्या स्पष्ट बोलणाऱ्या आहेत, असा विश्वास त्यांनी माझ्या बदल तेव्हा दाखवला. हा विश्वास फार मुश्किलने मिळतो.
अनेक पक्षात, अनेक नेते आहेत त्या सर्वांना माहिती आहे मी जिथे पण राहिली फार प्रामाणिक राहिली आहे. आज जरी मला तिकीट नाही मिळाले पण, मी पुन्हा कामाला लागली. तेव्हा फडणवीस स्वतःच रवींद्र चव्हाण यांना बोलले की, तुम्ही मंदा ताईंची काळजी करू नका तुम्ही माझ्यावर सोडा एवढा प्रचंड विश्वास या राज्याच्या मुख्यमंत्री यांचा माझ्यावर आहे. हीच गोष्ट मी मी कमवली आहे.
