कल्याण- कल्याण पश्चिमेतील गंधारी पुला जवळील के. एम. अग्रवाल महाविद्यालया समोरील रस्त्यावर पोलीस उपायुक्तांचे विशेष पथकाने कारवाई करुन दुर्मिळ वन्यजीव प्रजातीमधील मांडुळ जातीचा साप एका टोळक्याकडून रविवारी संध्याकाळी जप्त केला. काळ्या बाजारात या सापाची ७० लाखाला विक्री करण्यात येणार होती. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

वन्यजीव संरक्षण कायद्याने मांडुळ जातीच्या सापाची वाहतूक, तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही या टोळक्याने मांडुळा जातीचा साप कल्याण मध्ये विक्रीसाठी आणल्याने त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याने खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे टिटवाळा, वाडा, पालघर मनोर, भिवंडी वडवली भागातील रहिवासी आहेत.

concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी
Nagpur Holi
नागपुरात होळीत मद्यपींचा रस्त्यावर हैदोस; दोघांचा मृत्यू, शंभरावर…
senior citizen beaten Kalyan
कल्याणमधील गांधारी येथे ज्येष्ठ नागरिकासह कुटुंबियांना बेदम मारहाण, मुलांच्या झोका खेळ्यावरून झाला वाद

नीलेश रवींद्र हिलम (३१, रा. जांभळीपाडा, ता. वाडा, जि. पालघर), चेतन संजय कांबळे (१९, रा. मु. पो. वडवली, ता. भिवंडी), अरविंद शिवराम पंडित (४५, रा. वासुंद्री, टिटवाळा), विशाल यशवंत ठाकरे (२८, रा. मनोर, पालघर), अनिल सत्या काटेला (३५, रा. मनोर, पालघर), मधुकर (पूर्ण नाव नाही) अशी आरोपींची नावे आहेत. मधुकर आरोपी फरार झाला आहे. हवालदार सदाशिव देवरे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या विशेष पथकातील हवालदार संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरे यांना गुप्त माहिती मिळाली की पालघर जिल्ह्यातून काही तरुण कल्याण मध्ये दुर्मिळ वन्यजीव प्रजातीमधील मांडुळ साप विक्रीसाठी घेऊन येत आहेत. या सापाचा वापर जादूटोणा किंवा अघोरी औषधासाठी केला जातो. हे तरुण भिवंडी पडघा मार्गे येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती.

ही माहिती मिळताच हवालदार संजय पाटील यांच्यासह देवरे, भालेराव यांनी गंधारे पुला जवळ रविवारी संध्याकाळी सहा वाजता जवळ सापळा लावला. काही वेळाने सहा तरुण गंधारे पूल ओलांडून तीन दुचाकींवरुन के. एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या दिशेने आले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याचा पाठलाग केला. त्यांना अग्रवाल महाविद्यालया समोर अडविले. पोलिसांना पाहून मधुकर नावाचा इसम पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी सहा जणांना दुचाकीवरुन उतरुन त्यांची झडती घेतली. एका पिशवीत मांडुळ साप होता. हा साप कुठुण आणला आहे अशी विचारणा करताच टोळके निरुत्तर झाले. हेच ते तस्करी करणारे तरुण आहेत याची खात्री पटल्यावर पोलिसांनी सहा जणांना दुचाकीसह खडकपाडा पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

जंगल भागातून साप पकडुन तो शहरी भागात काळ्या बाजारात विकण्याचा या तरुणांचा व्यवसाय आहे का. आतापर्यंत या टोळक्याने किती मांडुळ साप विक्री केले आहेत. ते कोणाला हे साप विकत होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मांडुळ सापाची तस्करी करणारी टोळी यानिमित्ताने उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.