scorecardresearch

प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या

चार जणांनी मिळून तरणाची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. एका तरुणी बरोबरच्या प्रेमसंबंधातून ही हत्या झाली आहे

प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या
प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली भागात शनिवारी रात्री मानखुर्द येथील आदित्य सुरेश बर (२१) या तरुणाची खडेगोळवली भागातील चार तरुणांनी हत्या केली. एका तरुणी बरोबरच्या प्रेमसंबंधातून ही हत्या झाली आहे, असे कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा- ‘मराठी शाळांमध्ये संस्कृतीची जपणूक’; अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे प्रतिपादन

पोलिसांनी सांगितले, दिवा येथे राहणाऱ्या किरण सोनवणे (१९) या तरुणीचे खडेगोळवली मधील ललित उज्जेनकर (२२) या तरुणा बरोबर प्रेमसंबंध होते. ललित दारु, नशा करत असल्याने किरणने त्याच्या बरोबरचे प्रेमसंबंध तोडले होते. त्याचा राग ललितच्या मनात होता. तो किरणच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होता. किरणचे प्रेमसंबंध त्यानंतर मानखुर्द येथील आदित्य बर या तरुणाबरोबर जुळले होते. आदित्य नियमित मानखुर्द (साठेनगर) येथून दिवा येथे किरणच्या घरी येत होता. तो किरणच्या मोठ्या भावाचा मित्र होता. किरणचे आदित्य बरोबर प्रेमसंबंध जुळल्याचे ललितला समजले होते. तेव्हापासून ललित अस्वस्थ होता.

हेही वाचा- डोंबिवलीतील रिक्षा चोराला सागर्ली गावातून अटक

दोन वर्षापूर्वी किरणच्या यांच्या घरात असलेले श्वानाचे पिल्लू घरात किरणच्या वहिनीला बाळ झाल्याने संगोपन करण्यासाठी ललितला दिले होते. ते पिल्लू आता परत करत करावे म्हणून किरणची वहिनी रश्मी ललितकडे तगादा लावून होती. किरण बरोबरचे प्रेमसंबंध बिघडल्याने ललित पिल्लू परत करण्यास तयार नव्हता. आदित्य नेहमीप्रमाणे एक दिवस किरणच्या घरी आला. त्याला तिच्या मोबाईलच्या दर्शनी भागात ललितची छबी दिसली. ललित बरोबरचे प्रेमसंबंध तुटूनही किरण ललितच्या संपर्कात असल्याचा संशय आदित्यला आला. यावरुन दोघांच्यात भांडण झाले. किरणने त्याच्या बरोबर आपले काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

आमच्या घरातील श्वानाचे पिल्लू ललितच्या घरी आहे. त्यामुळे माझी वहिनी ललितच्या संपर्कात आहे असे तिने प्रियकर आदित्यला सांगितले. आपण ललितच्या घरातील पिल्लू घेऊन येऊन म्हणजे तुमचा ललितशी संपर्क राहणार नाही, असा सल्ला आदित्यने दिला. ललित आणि त्याचे आरोपी मित्र शनिवारी संध्याकाळी किरणच्या दिव्यातील घरी आले. मी पिल्लू देणार नाही. मी चिंताग्रस्त आहे. तू मला संपर्क करू नकोस असा इशारा दिला. रश्मी हिने काही दिवसांसाठी पिल्लू परत देण्याची मागणी केली. ललितने ती मान्य केली. हनी नावाचे पिल्लू घेण्यासाठी किरण आणि तिचा मानखुर्द येथील मित्र शनिवारी संध्याकाळी विठ्ठलवाडी येथे पोहचले. तेथून ते ललितला संपर्क करुन श्वानाचे पिल्लू घेऊन ये आम्ही खडेगोळवली बाजार जनार्दन म्हात्रे कार्यालयाच्या बाजुला उभे आहोत असे सांगितले. श्वानाचे पिल्लू नेण्यासाठी किरणने एक रिक्षा तयार ठेवली. त्यात आदित्य बसून होता.

हेही वाचा- विश्लेषण: क्लस्टर सक्तीचा जाच कुणाच्या पथ्यावर? अधिकृत इमारतीतील रहिवाशांनाच नाहक मनस्ताप होतोय का?

यावेळी ललितने किरणचा राग तिचा नवीन प्रियकर आदित्यवर काढण्याचे ठरविले. ललितचा मित्र नकुल रिक्षेजवळ आला. त्याने किरणला पिल्लू घरातून निघण्यास तयार नाही. तुला ललितच्या आईने बोलविले आहे असे सांगितले. किरण ललितच्या घरी जाण्यासाठी दहा फूट पुढे गेली. त्यावेळी ती उभी असलेल्या भागात लपून बसलेल्या ललित आणि त्याच्या मित्रांनी रिक्षेत बसलेल्या आदित्यला रिक्षेतून बाहेर खेचून त्याला बेदम मारहाण केली. ललितने जवळील चाकुने आदित्यवर वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार पाहून किरण माघारी आली तिने आदित्यला मारहाणीपासून वाचविण्याचा प्रयत्न केला. तिने जखमी आदित्यला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेले. तेथे डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. किरणच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांविरुध्द खुनाचा गु्न्हा दाखल केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 18:03 IST

संबंधित बातम्या