ठाण्यात पुरुषाची सोनसाखळी हिसकावली

याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

ठाण्यातील सायबर टेक कंपनीजवळ रस्त्यावरून जाणाऱ्या युवकास त्याच्या समोरून आलेल्या दोन व्यक्तींनी मारहाण करून त्याच्या गळ्यात सोनसाखळी हिसकावून पळ काढल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. २९ वर्षीय तरुण रस्त्यावरून जात असताना त्याला समोरून आलेल्या दोन व्यक्तींनी धक्का दिला व नंतर त्याला मारहाण केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. एस. क्षीरसागर अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mans gold bracelet sanched in thane