छातीत दुखू लागल्याने गायक आनंद शिंदे रूग्णालयात दाखल

त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Marathi singers , Marathi singer Anand Shinde, chest pain, Thane, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
Marathi singer Anand Shinde: शिंदे यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे.

अचानक छातीत दुखू लागल्यामुळे प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांना शनिवारी सकाळी कल्याण येथील फोर्टिस रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शिंदे यांच्या हदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी हिंदुजा रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Marathi singer anand shinde admitted to hospital due to chest pain