ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलिसांच्या सहकार्याने १४ ऑगस्टला १० किमी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा  पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून सुरू होणार असून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातही ठाणे महापालिका प्रशासनाकडून १४ ऑगस्ट या दिवशी मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी  महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, पोलीस अधिकारी, ठाणे जिल्हा ॲथलेटिक संघटनेचे सचिव अशोक आहेर, प्रमोद कुलकर्णी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानुसार,

sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
Meeting in Mumbai under the chairmanship of Chief Minister Eknath Shinde regarding Sulkood water supply Kolhapur
पुन्हा एकदा ठरलं! सुळकुड पाणी योजनेचा कंडका पडणार; मुख्यमंत्र्यांकडे शुक्रवारी बैठक
people from Ichalkaranji will show black flags to cm eknath shinde and Minister suresh Khade for Sulkood water issue
सुळकुड पाणी प्रश्नासाठी मुख्यमंत्री आणि मंत्री खाडे यांना रविवारी इचलकरंजीत काळे झेंडे दाखवणार
electricity
कंत्राटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील वीज यंत्रणा सलाईनवर.. ‘या’ आहेत मागण्या…

जिल्हास्तरावर होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पुरूष (वयोगट १८ वर्षावरील खुला गट), महिला (१६ वर्षावरील खुटा गट) असे दोन गट असणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात पाचपाखाडी येथील ठाणे महानगरपालिका मुख्यालयापासून होणार असून नितिन कंपनी, सेवारस्ता, कोरम मॉल, वर्तकनगर, शिवाईनगर, उपवान तलाव, बिरसा मुंडा चौक, उन्नती गार्डन, शिवाईनगर येथून पुन्हा त्याच मार्गावरुन महापालिका मुख्यालय येथे समाप्त होणार आहे. स्पर्धेतील पुरूष व महिला या दोन्ही गटातील प्रथम क्रमांकास रुपये १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १२ हजार रुपये,  तृतीय क्रमांकास १० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास ७ हजार आणि पाचव्या क्रमांक    पाच हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.