महापालिकेकडून दरवर्षी महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा करोना संकट कमी झाले असले तरी पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे यंदा तरी मॅरेथॉन स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम असतानाच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साधून पालिका प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाळ्यात ही स्पर्धा आयोजित केली जाते –

ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी ‘ठाणे महापौर मॅरेथॉन’ स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असे सर्वजण सहभागी होतात. २१ किमी ते ५ किमी अंतरपर्यंतची स्पर्धा असते. या स्पर्धेच्या माध्यमतून विविध सामाजिक संदेश दिले जातात. पावसाळ्यात ही स्पर्धा आयोजित केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून करोना संकटामुळे ही स्पर्धा होऊ शकली नव्हती. यंदा करोना संकट कमी झाले असले तरी पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे यंदा तरी मॅरेथॉन स्पर्धा होणार की नाही, याबाबत संभ्रम होता. असे असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साधून पालिका प्रशासनाने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” साजरा करण्यात येणार –

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्यावतीने मार्गदर्शक सुचनेनुसार ठाणे शहरात ठाणे महानगपालिका व विविध सामाजिक संस्थेच्या विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा,वक्तृत्व, निबंध, चित्रकला स्पर्धा, चित्र प्रदर्शन, नृत्य, बाईक रॅली अशा विविधांगी ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” साजरा करण्यात येणार असून १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याच दरम्यान यामध्ये १० किमी अंतराची मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathon competition to be held in thane after two years msr
First published on: 26-07-2022 at 12:14 IST