कल्याण : सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला वेड लागले आहे, असा देखावा निर्माण केला. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला घरात कोंडून ठेवले. या सगळ्या प्रकाराने आलेल्या नैराश्यातून बदलापूरमधील कात्रप भागातील एका विवाहितेने राहत्या घरात बुधवारी आत्महत्या केली. या प्रकरणात बदलापूर पोलिसांनी पती, दीर आणि सासरा यांना अटक केली आहे.

रोहित सतिश पवार (३०, पती), दीर धनंजय पवार (३६), सासरा सतिश पवार (६२), सासु सुजाता (६०), जाऊ प्रियंका धनंजय पवार (३५) अशी गुन्हा दाखल आरोपींची नावे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील आथणी तालुक्यातील एका गावातील प्रमिला चंद्रकांत निकम (४६) यांनी याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

blind couple stays with son's body
Blind Couple: मुलाचा घरात दुर्दैवी मृत्यू; अंध आई-वडील उपाशीपोटी चार दिवस घरातच पडून, हृदय पिळवटून टाकणारी घटना
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Indian Army dog Phantom
Jammu Kashmir Encounter: दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा ‘फँटम’ श्वान शहीद; लष्काराकडून हळहळ व्यक्त
Kanpur Crime News
Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य
Delhi crime News
Delhi : धक्कादायक! टोपीवरून झालेल्या वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या; आरोपीच्या आईने पुरवली बंदूक
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
actor Nitin Chauhaan dies at 35
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन, ३५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Wife Killed Husband For Property
Woman Killed Husband : आठ कोटींच्या मालमत्तेसाठी पत्नीने केली पतीची हत्या, मृतदेह जाळण्यासाठी ८४० किमीचा प्रवास आणि…

हेही वाचा : बँक व्यवहारांवर निवडणूक विभागाची नजर ! जिल्हास्तरीय बँक समनव्ययकाची नियुक्ती

पोलिसांनी सांगितले, बेळगाव येथील तक्रारदार प्रमिला निकम यांची मुलगी सोनाली हिचे लग्न बदलापूर कात्रप भागातील रोहित पवार याच्या बरोबर झाले होते. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी सोनाली हिचा हुंड्यासाठी छळ सुरू केला होता. पती रोहित याला अन्य ठिकाणी नोकरी लावायची आहे यासाठी पैसे हवे असल्याचे सांगून सासरच्या कुटुंबीयांनी सोनालीकडून तिचे सोन्याचे स्त्रीधन काढून घेतले. त्यानंतर सोनालीच्या चारित्र्यावर कुटुंबीयांनी संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. सोनालीने घराबाहेर पडू नये आणि तिने माहेरी आई प्रमिला किंवा अन्य कोणाशी संपर्क करू नये म्हणून तिला घरातील खोलीत कोंडून ठेवण्यात आले. ती वेडी झाल्याच्या दृश्यध्वनी चित्रफिती तयार करून सासरच्या मंडळींनी त्या मयत सोनालीच्या आईला दाखविल्या.

हेही वाचा : Mumbai Local Update : कल्याणमध्ये रुळांवर घसरलेले डबे हटवले, पण मध्य रेल्वे रुळांवर येईना; आज मुंबई लोकलची स्थिती काय?

या सगळ्या प्रकाराने नैराश्य आल्याने सोनाली पवार हिने बुधवारी राहत्या घरात आत्महत्या केली. ही माहिती समजताच सोनालीचे बेळगाव येथील कुटुंब बदलापूरमध्ये दाखल झाले. सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे सोनालीने आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत सोनालीच्या आईने बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. डी. अमृतकर तपास करत आहेत.

Story img Loader