डोंबिवली: ज्येष्ठ गणित संशोधक प्रा. डॉ. सदाशिव गजानन देव यांचे शनिवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुषमा, एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई, नात असा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीतील पेंडसेनगरमध्ये डॉ. सदाशिव देव यांचा अनेक वर्षे निवास होता. डॉ. देव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्र माहुली येथील रहिवासी. शिक्षणासाठी ते मुंबईत आले. रुपारेल महाविद्यालयातून विज्ञानाचे गणित विषयातून पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी गणितामधून विद्यावाचस्पती पदवी संपादन केली. पोस्ट डॉक्टर फेलो म्हणून ते कॅनडात अ‍ॅडमर्टन येथील अल्बर्टा विद्यापीठात अडीच वर्षे होते. तेथून परतल्यानंतर ते पुन्हा मराठवाडा विद्यापीठात कार्यरत राहिले. ४० वर्षे त्यांनी गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले.

मुंबई विद्यापीठाच्या गोवा पदव्युत्तर केंद्राचे ते प्रमुख आणि संचालक होते. गणित विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी येथे काम पाहिले. भाषा, कोश विषयावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. या विषयांशी संबंधित ८० शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केले. टेक्सास, फ्लोरिडा येथील गणित, विज्ञान संस्थांमध्ये त्यांनी मानद प्राध्यापक म्हणून काम केले.

विशाखापट्टणम येथे ज्येष्ठ गणिततज्ज्ञ लक्ष्मिकांतम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅथेमॅटिक्स सायन्सच्या उभारणीत डॉ. सदाशिव देव यांनी महत्त्वाचे योगदान दिले. या संस्थेचे ते दोन वर्षे संचालक होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathematical researcher dr sadashiv deo passed away zws
First published on: 17-10-2021 at 03:21 IST