scorecardresearch

Premium

कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय अधिकारी तृणाली महातेकर निलंबित, रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरण

कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे.

Medical Officer Trunali Mahateka
कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय अधिकारी तृणाली महातेकर निलंबित, रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरण (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना पालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वी रुक्मिणीबाई रुग्णालयात प्रसूतीसाठी आणलेल्या एका फिरस्ती महिलेला दाखल करून घेऊन तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला अन्यत्र जाण्याची सूचना डाॅ. महातेकर यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी दिली होती. याप्रकरणी चौकशी समितीने त्यांच्यावर ठपका ठेवला होता.

सप्टेंबरमध्ये रात्रीच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर एका फिरस्ती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पादचारी, महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी, काही महिलांनी या महिलेला तातडीने पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. या महिलेला रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रोखून ठेवले होते. याठिकाणी पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. तुम्ही या महिलेला प्रसूतीसाठी अन्य रुग्णालयात घेऊन जा, असे कर्मचारी सांगत होते. या महिलेला तात्पुरते दाखल करून पहिले उपचार सुरू करा, अशी मागणी पोलीस करत होते.

tribal farmers protest in nashik,
नाशिक: आदिवासी शेतकरी आंदोलनातील एकाचा मृत्यू; जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव
case of receiving bribe by treating him under government scheme Bribery doctor in private hospital taken into police custody
खासगी रुग्णालयातील लाचखोर डॉक्टरांना पोलीस कोठडी, शासकीय योजनेत उपचार करून लाच घेतल्याचे प्रकरण
Ahmednagar lawyers gate Collector office
नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
Transfer of 120 officers and employees in navi mumbai municipal corporation
नवी मुंबई : महापालिकेत १२० अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

हेही वाचा – आपल्याकडे पाहून हसत असल्याच्या संशयातून महिलांकडून तरूणीची हत्या; कळवा येथील घटना

रुग्णालयात त्यावेळी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. महातेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी फिरस्ती महिलेला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. या महिलेला कोठे दाखल करायचे असा विचार पोलीस करत होते. दरम्यानच्या काळात ती महिला रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावरच प्रसूत झाली. या प्रकाराने काही वेळ गोंधळ उडाला.

प्रसूती कळा सुरू असलेल्या एका महिलेला दाखल करून घेण्यास पालिका रुग्णालयाने टाळाटाळा केल्याने सर्व स्तरातून पालिका अधिकाऱ्यांवर टीका सुरू होती. आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड, आमदार प्रमोद पाटील यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. पालिकेने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने या प्रकरणात घटना घडली त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या डाॅ. महातेकर यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता.

हेही वाचा – ठाण्यातील हा आमदार ‘मॉरिशस’मध्ये साकारणार छत्रपती शिवाजी महारांजाची भूमिका

येणारे हिवाळी अधिवेशन, डाॅ. इंदुराणी जाखड आयुक्त म्हणून हजर झाल्यापासून महापालिका अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आहे. या प्रकरणात कोणाची पाठराखण केली तर आयुक्तांकडून कारवाई होऊ शकते, या भीतीने दोन दिवसांपूर्वी पालिकेने महातेकर यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. निलंबन काळात डाॅ. महातेकर यांना दररोज पालिका मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

“रुक्मिणीबाई रुग्णालयातील प्रसूती प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून वैद्यकीय अधिकारी डाॅ. तृणाली महातेकर यांना प्रशासनाने निलंंबित केले आहे.” – डाॅ. प्रतिभा पानपाटील, प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Medical officer trunali mahatekar in kalyan dombivli mnc suspended ssb

First published on: 27-11-2023 at 15:56 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×