scorecardresearch

Premium

लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही? मीरा रोड हत्या प्रकरणाला वेगळं वळण?

आरोपी मनोज साने आणि सरस्वती वैद्य गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड भागामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.

meera bhayandar murder case (1)
मीरा भाइंदर हत्या प्रकरणाला नवं वळण? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मीरा रोड भागातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असणाऱ्या जोडप्यातील ५६ वर्षीय मनोज साने याने पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि नंतर बादलीत लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. हा प्रकार उघड होऊन २४ तासही उलटले नसताना त्यात एक नाट्यमय वळण लागण्याची शक्यता आहे. मृत महिलेने तीन दिवस आधीच विष प्राशन करून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या माहितीला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नसला, तरी त्यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मीरा रोडच्या गीता नगर परिसरातल्या दीप इमारतीमधून एका आरोपीला पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. मनोज साने असं या ५६ वर्षीय आरोपीचं नाव असून तो सरस्वती वैद्य या ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरसोबत तीन वर्षांपासून इथे राहात होता. मात्र, बुधवारी शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता हा सगळा प्रकार उघड झाला.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

फ्लॅटमध्ये आधी महिलेचे पाय पोलिसांना सापडले. त्यानंतर घरातच एका बादलीत आणि पातेल्यात महिलेचं धड आणि शीराचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवून नंतर लपवून ठेवले होते. काही तुकडे आरोपीनं गॅसवर भाजल्याचंही सांगितलं जात आहे. या सगळ्या प्रकारामुळे खळबळ उडाली असून मनोज सानेनंच मृत महिलेची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

हत्या की आत्महत्या?

दरम्यान, या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. सरस्वती वैद्यची आरोपीनं हत्या केली नसून तिनं तीन दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज सानेला सरस्वतीच्या चारित्र्यावर संशय होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद व्हायचा. अशाच एका वादानंतर तीन दिवसांपूर्वी सरस्वतीने विष पिऊन घरातच आपले जीवन संपवले होते.यामुळे तिच्या मृत्यूस आपण कारणीभूत ठरणार असल्याची भीती मनोज याला वाटू लागली होती.

Video: लिव्ह इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले; मीरारोडमधील घटनेवर सुप्रिया सुळेंचं संतप्त ट्वीट!

सरस्वतीच्या मृत शरीराची परस्पर विल्हेवाट लावण्यास त्याने सुरुवात केली. यात त्याने कटरच्या वापराने तिच्या शरीराचे तुकडे करून ते कुकर मध्ये शिजवले. त्यानंतर भाजून ते मिक्सरच्या मदतीने बारीक केले.तो राहत असलेल्या सोसायटीच्या मागील गटारात त्याने हे तुकडे फेकल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्याने वापरलेले साहित्य आणि बाईक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशीही माहिती समोर आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meera bhayandar murder live in partner woman dead body chopped off suicide suspicion pmw

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×