बदलापूर स्थानकाजवळच्या दुकानदारांची जागा जाणार असल्याने संघर्षांचा पवित्रा

वर्षभरापूर्वी रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली बदलापूर बाजापेठेतील सुमारे दीडशे दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही फुटांच्या जागेत अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने नव्याने उभारली. मात्र आता पुन्हा नव्याने व्यापाऱ्यांवर संकट आले आहे. बदलापूर रेल्वे स्थानकातील ‘होम प्लॅटफॉर्म’च्या उभारणीसाठी जागा जाणार असल्याने व्यापाऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांनी याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रिक्षाचालक संघटनेनेही उडी घेतली आहे.

Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर बाजारपेठेतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी २२ नोव्हेंबर २०१६ रोजी धडक कारवाई करण्यात आली होती. यात १५० दुकाने जमीनदोस्त करण्यात आली होती. यावेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत अधिकृत बांधकाम बेकायदा ठरवल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला होता. ७० वर्षांहून अधिक काळ मालकी हक्क असलेले आणि पालिकेला कर भरल्याचे पुरावे असतानाही अधिकाऱ्यांनी सूडबुद्धीने ही कारवाई केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

वर्षभरापासून २८ व्यापाऱ्यांचा व्यवसाय बंद असून अनेक व्यापारी देशोधडीला लागले आहेत. त्यातच आता बदलापूर स्थानकात फलाट क्रमांक एकजवळ ‘होम प्लॅटफॉर्म’ उभारला जाणार असल्याच्या बातमीने व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या संदर्भातील निविदा १५ फेब्रुवारी रोजी निविदा काढली जाणार आहे. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. ‘ललित स्टोअर्स’चे मालक विक्रांत मेहता म्हणाले की सर्व पुरावे असतानाही पालिकेने आम्हाला बेकायदा ठरवले आहे. त्यात आता ‘होम प्लॅटफॉर्म’ बनवल्यास आम्हाला जागाच उरणार नाही. त्यामुळे याची जागा बदलावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाकडून १६ जूनमध्ये बदलापूर स्थानकात ‘होम प्लॅटफॉर्म’साठी मोजणी करण्यात आली होती. त्यावेळी २१० मीटर रुंद फलाटासाठी रेल्वेची जागावगळता ६०३ चौरस मीटरची जागा आवश्यक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे उरलेल्या अवघ्या काही फुटांच्या दुकानावरही आता हातोडा चालविण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असल्याची भावना बाजारपेठ व्यापारी जनसेवा मित्रमंडळाच्या राजेश जाधव यांनी व्यक्त केली.

रिक्षा थांबेही आवश्यक आहेत. मात्र फक्त ‘होम प्लॅटफॉर्म’साठी ते काढले जात असतील तर ते चुकीचे आहे. त्यासाठी अन्य जागेचा विचार व्हावा; अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल.

-अरुण मुंढे, रिक्षा चालक-मालक वेल्फेअर असोसिएशन, बदलापूर

प्रवाशांच्या मागणीनुसार आणि रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ‘होम प्लॅटफॉर्म’चा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यात जागेचा काही प्रश्न असल्यास तो भूमी अधिग्रहण कायद्यानुसार सोडवण्यात येईल. वादाचा मुद्दा प्रलंबित ठेवला जाणार नाही.

-ए. के. सिंग, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे