ठाणे विशेष सत्र न्यायालयाकडून सुनावणी

अल्पवयीन बालिकेला रुग्णालयाच्या इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला असून या प्रकरणी ठाणे विशेष सत्र न्यायालयाने आरोपीस १२ वर्षांची शिक्षा आणि २५ हजारांचा दंड सुनावला आहे. आरोपीने दंडाची २५ हजारांची रक्कम न भरल्यास त्याला एक वर्षांचा अधिकचा कारावास भोगावा लागणार आहे. कलंदर दादू कादर बादशहा शेख (२८) असे या आरोपीचे नाव असून तो भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील बारक्या कंपाऊंड येथे राहणारा आहे. २ डिसेंबर २०१३ रोजी भिवंडीच्या स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या इमारतीमध्ये हा गुन्हा घडला होता. विशेष जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश भाडिया यांनी ही शिक्षा सुनावली.

Minor girl molested in Kolhapur Three years of hard labour for the accused
कोल्हापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरी
nagpur wife murder for 200 rupees marathi news
दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…
Arvind Kejriwal to judicial custody
अरविंद केजरीवाल यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तिहारमध्ये रवानगी होण्याची शक्यता
Nagpur
नागपूर : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

भिवंडी परिसरात राहणाऱ्या कलंदर शेख हा नात्यातील सहा वर्षीय बालिकेला तिच्या राहत्या घरातून स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्या ठिकाणी तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केले. तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.