scorecardresearch

Premium

मनोज सानेला श्रद्धा वालकरसारखीच लावायची होती सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट; कबुलीजबाबात केले धक्कादायक दावे!

मीरा रोड सरस्वती वैद्य हत्या प्रकरणातील आरोपी मनोज सानेचे पोलीस तपासात धक्कादायक दावे!

mira road murder case saraswati vaidya manoj sane
श्रद्धा वालकर प्रकरणाचा मनोजनं अभ्यास केला होता! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मीरारोड भागात काही दिवसांपूर्वीच एक हत्या प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली. या भागातल्या एका फ्लॅटमध्ये पोलिसांना एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. यातले काही कुकरमध्ये शिजवलेले, काही पॅनवर भाजलेले तर काही मिक्सरमध्ये बारीक केलेले होते. काही तुकडे बादलीत तर काही पातेल्यात ठेवले होते! सरस्वती वैद्य नामक ३२ वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे हे तुकडे होते. ५६ वर्षीय मनोज साने या तिच्या लिव्ह-इन पार्टनरनंच तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले. मात्र, आता पोलीस तपासात मनोज सानेनं अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

नेमकं काय घडलं?

बुधवारी मीरारोड पोलिसांना एका इमारतीतील रहिवाश्याचा फोन आला. एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचं या रहिवाशानं सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी फ्लॅटचं कुलूप तोडून आत प्रवेश केला असता आतलं भयानक दृश्य पोलिसांच्या नजरेस पडलं. हे दृश्य इतकं भीषण होतं की त्यातल्या काही कर्मचाऱ्यांना ओकारीच आली! मनोज साने आणि सरस्वती वैद्य त्या फ्लॅटमध्ये गेल्या तीन वर्षांपासून राहात होते. हे दोघे १० वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरीही सरस्वतीची हत्या नेमकी का झाली? याचं उत्तर अद्याप पोलिसांना सापडलेलं नाही.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

मनोज सानेचे धक्कादायक दावे!

दरम्यान, पोलिसांनी मनोज सानेला सरस्वतीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. मनोज सानेनंच तिच्या मृतदेहाचे एका इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने तुकडे केले होते. या तुकड्यांची तो भाजून, शिजवून नंतर इमारतीच्या मागच्या गटारात किंवा मीरारोडच्याच काही इतर भागात नेऊन विल्हेवाट लावत होता. मात्र, आता यापुढे मनोज सानेनं त्याच्या कबुली जबाबबात धक्कादायक दावे केले आहेत. आऊटलूकनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे काढले फोटो, कटर आणलं.. मनोज सानेने काय केलं?

श्रद्धा वालकर प्रकरणाचा प्रभाव

मनोज सानेनं आपल्या जबाबात श्रद्धा वालकर प्रकरणाचा प्रभाव असल्याचे संकेत दिले आहेत. सरस्वतीला दहावीच्या परीक्षेत मदत व्हावी, म्हणून त्यानं गणितही शिकवल्याचं सानेनं सांगितलं आहे. सरस्वतीनं स्वत: तीन दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या केली होती, पण हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असल्याचं सानेनं जबाबात सांगितलं आहे. आऊटलुकच्या वृत्तानुसार, ४ जून रोजी सरस्वतीचा मृतदेह पहिल्यांदा बेडरूम पाहिल्यानंतर आपल्याला श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाल्याचं मनोज साने म्हणालाय.

या वृत्तानुसार, मनोज सानेनं श्रद्धा वालकर प्रकरणाचा व्यवस्थित पाठपुरावा केला होता. सरस्वती निश्चल झाल्याचं निश्चित झाल्यानंतर सानेनं श्रद्धा वालकरप्रमाणेच सरस्वतीच्याही मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं. सरस्वतीच्या मृतदेहाचे शक्य तितके लहान तुकडे करायला त्यानं सुरुवात केली. त्यानंतर काही भाग कुकरमध्ये शिजवले, तर काही भाग गॅसवर भाजले. काही तुकडे त्यानं आऊटलेट ड्रेनमध्येही टाकले. पण त्यामुळे सोसायटीचा पाईप तुंबला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे काही भाग तर इतके छोटे होते, की ते एखाद्या मृतदेहाचेच आहेत, हे ओळखूही येत नव्हतं.

भयानक… ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि…; काय आहे मीरारोड हत्या प्रकरण?

मनोज सानेनं फ्लॅटच्या एका बेडरुममध्ये सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे तुकडे कुकर, पातेलं, टब, बादली यात भरून ठेवले होते. तर दुसऱ्या बेडरूमध्ये तो स्वत: रात्री झोपायचा. मनोज सानेने सरस्वती वैद्यची हत्या केली. त्यानंतर मनोजने सरस्वतीच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली होती. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची? यासाठी त्याने गुगलवर माहिती सर्च केली होती. सरस्वतीची हत्या केल्यानंतर मनोजने तिच्या मोबाईलमधला सगळा मजकूर मनोजने डिलिट केला असंही पोलिसांनी सांगितलं.

काही महिन्यांपूर्वीच साने झाला होता बेरोजगार!

मनोज साने मीरारोडमधल्या एका रेशनिंगच्या दुकानात काम करत होता. मे महिन्यात हे दुकान बंद झाल्यापासून तो बेरोजगार झाला होता. साने आणि सरस्वती कुणाशीच बोलत नसल्यामुळे सोसायटीतील इतर कुणालाही त्यांच्याबद्दल फारशी काही माहिती समजली नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2023 at 16:50 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×