Premium

मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे ती तारुण्य वयातच मनोज यांच्या प्रेमात पडली होती.मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.

Mira Road murder case, Manoj Sane, Saraswati Vaidya, orphan, leave in relationship
मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

मीरा रोड हत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून या प्रकरणाची दखल राष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे. तपास जसा पुढे सरकत आहे तशी या हत्याकांडातली नवीन माहिती समोर येत आहे. मीरा रोड येथे धडाचे तुकडे आढळून आलेल्या सरस्वती वैद्यचा मृत्यू विष घेतल्याने झाला असल्याचा दावा आरोपी मनोज साने याने केला आहे.मात्र हे विष तीने स्वतः घेतले की तिला पाजण्यात आले होते याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोघेही अनाथ असल्यामुळे आले संपर्कात

एवढंच नाही तर हे दोघेही अनाथ असल्याचं निमित्त होत ते एकमेकांच्या संपर्कात आले आणि लिव्ह ईन रिलेशनमध्ये राहू लागल्याची माहिती समोर आली आहे. मनोज साने हा पंधरा वर्षांपूर्वी बोरीवली येथील एका किराणा दुकानात नोकरीला होता.यावेळी सरस्वती त्याच्याकडे साहित्य खरेदी करण्यासाठी येत होती.सरस्वती ही अनाथ असल्यामुळे ती तारुण्य वयातच मनोज यांच्या प्रेमात पडली होती.मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मागील पंधरा वर्षांपासून ते लिविंग रिलेशनशिपमध्ये राहत होते.तीन वर्षांपूर्वी मीरा रोडच्या गीता नगर येथे राहायला आल्यानंतर सरस्वतीला मनोजच्या चारित्र्यावर संशय येत होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत होत होते.अखेर अश्याच एका वादामुळे ही घटना घडली असावी असा खुलासा पोलीस तपासात झाला आहे.

हेही वाचा… लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही? मीरा-भाईंदर हत्या प्रकरणाला वेगळं वळण?

हेही वाचा… “मृतदेहाचे तुकडे करून कुकरमध्ये शिजवले आणि…”, मीरा रोडमधील महिलेच्या हत्याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर

आरोपीला आज करणार कोर्टात हजर

मीरा रोड येथे लिविंग रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या मनोज साने याने सरस्वती वैद्य याची हत्या करून तुकडे केल्याची घटना समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यामुळे नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी युद्ध पातळीवार तपास करून हत्येसाठी वापरण्यात आलेले साहित्य हे पुरावे स्वरूपात हस्तगत केले आहे.त्यानुसार आज ( गुरुवारी ) मनोज ला कोर्टापुढे हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mira road murder case manoj sane and saraswati vaidya both are being an orphan came in contact asj

First published on: 08-06-2023 at 12:56 IST
Next Story
कल्याणमधील नोकरदार महिलेची १४ लाखांची फसवणूक