ठाणे: नव्या ठाण्याच्या खाडी पूलांसाठी एमएमआरडीएच्या हालचाली | MMRDA move for new Thane creek bridges thane amy 95 | Loksatta

ठाणे: नव्या ठाण्याच्या खाडी पूलांसाठी एमएमआरडीएच्या हालचाली

भिवंडी शहर हे गोदाम आणि वस्त्रोद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हजारो वाहने या भागातून मुंबई नाशिक महामार्गाने घोडबंदर, गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात.

mmrda
नव्या ठाण्याच्या खाडी पूलांसाठी एमएमआरडीएच्या हालचाली

भिवंडी शहराला घोडबदंर पासून थेट जोडता यावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर अशा तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. या उड्डाणपूलांच्या निर्मितीसाठी एमएमआरडीएच्या हालचालींना वेग आला आहे. एमएमआरडीएने या प्रकल्पांचा विस्तृत प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची निविदा काढली आहे. हे उड्डाणपूल तयार झाल्यास मुंबई नाशिक महामार्ग, जुना आग्रा रोड येथून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिसाला मिळणार आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात एका जाहीरात फलकाने अडविले मेट्रोचे काम ; फलक काढण्यासाठी संबंधित जाहीरात ठेकेदाराकडून होतेय चालढकल

भिवंडी शहर हे गोदाम आणि वस्त्रोद्योगांचे शहर म्हणून ओळखले जाते. हजारो वाहने या भागातून मुंबई नाशिक महामार्गाने घोडबंदर, गुजरातच्या दिशेने वाहतूक करत असतात. हलक्या वाहनांचाही भार या मार्गावर अधिक असतो. अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच भिवंडी शहराला थेट ठाण्याशी जोडता यावे यासाठी एमएमआरडीएने १ हजार १६२ कोटी रूपयांचा हे तीन उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये घोडबंदर येथील गायमुख ते पायेगाव, कासारवडवली ते खारबाव आणि कोलशेत ते काल्हेर येथे हे उड्डाणपूल प्रास्तावित आहेत. हे तिन्ही पूल ठाणे खाडीवरून थेट भिवंडीत जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांचा वेळ आणि इंधनही बचत होणार आहे. तसेच अवजड वाहनांची वाहतूकही थेट घोडबंरच्या दिशेने होणार असल्याने व्यापाऱ्यांना उद्योगांच्या दृष्टिने मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्यासाठी एमएमआरडीएने आता हालचाली अधिक जलद गतीने सरू केल्या आहेत. एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याची निविदा काढली आहे. त्यामुळे सल्लागार नेमल्यानंतर लवकरच प्रकल्पाच्या पायाभरणीला सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच हे तीन पूल झाल्यास भिवंडीत नागरिकीकरणही मोठ्याप्रमाणात होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>कल्याण डोंबिवली पालिकेचा अहवाल मिळताच डोंबिवलीतील भूमाफियांची ‘ईडी’कडून चौकशी

असे आहेत तीन खाडीपूल
१) गायमुख ते भिवंडीतील चिंचोटी येथील पायेगाव पर्यंत १.८० किमीचा खाडी पूल असेल.

२) कासारवडवली ते भिवंडीतील खारबाव पर्यंत जोडणारा ८०० मीटरचा खाडी पूल असेल.

३) कोलशेत ते भिवंडीतील काल्हेर हा सुमारे ५०० मीटरचा खाडीपूल असेल.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 15:53 IST
Next Story
ठाण्यात एका जाहीरात फलकाने अडविले मेट्रोचे काम ; फलक काढण्यासाठी संबंधित जाहीरात ठेकेदाराकडून होतेय चालढकल