scorecardresearch

Premium

ठाणे : टोल दरवाढीविरोधात मनसेचे उपोषण सुरूच, उपोषणाचा तिसरा दिवस

टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मनसेचे मुलुंड टोलनाक्याजवळ उपोषण सुरू आहे. या उपोषणास मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

MNS hunger strike in Thane
ठाणे : टोल दरवाढीविरोधात मनसेचे उपोषण सुरूच, उपोषणाचा तिसरा दिवस (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

ठाणे : टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून मनसेचे मुलुंड टोलनाक्याजवळ उपोषण सुरू आहे. या उपोषणास मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. राज्य सरकारने टोल दरवाढ रद्द करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

ठाण्याच्या वेशीवर असलेल्या मुलुंड टोलनाक्यावर १ ऑक्टोबरपासून लागू केलेल्या टोल दरवाढीविरोधात मनसेने ३० सप्टेंबरपासून विविध मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मनसेच्यावतीने आनंदनगर येथे मानवी साखळी तयार करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात मनसेने ठाण्यातील विविध चौकांत निदर्शने करून नागरिकांमध्ये टोल दरवाढीबाबत जनजागृती केली होती. तसेच टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन आंदोलन केले होते.

Farmers Delhi Chalo Protest
शेतकरी आंदोलनाला गालबोट? एका शेतकऱ्याच्या मृत्यची अफवा आणि दिल्ली मोर्चा पुढे ढकलला
love triangle nagpur
‘पती, पत्नी और वो…’ प्रेमाच्या त्रिकोणातून दोन संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; भरोसा सेलने…
Interim Budget 2024 Date time
Interim Budget 2024 : तारीख, वेळ अन् अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काय अपेक्षा?
Mallikarjun Kharge writes to Mamata Banerjee requesting security for Bharat Jodo Nyaya Yatra
‘भारत जोडो न्याय यात्रे’ला सुरक्षा पुरवावी! मल्लिकार्जुन खरगे यांची ममता बॅनर्जीना पत्र लिहून विनंती

हेही वाचा – ठाण्यात रुंद रस्ते पार्किंगसाठी आंदण? रुंदीकरणानंतरही कोंडी कायम

हेही वाचा – बदलापूर: पालिका मुख्यालयाबाहेरच खड्ड्यांची आरास

तिसऱ्या टप्प्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह १० ते १५ पदाधिकाऱ्यांनी गुरुवारपासून आनंदनगर टोलनाका येथे उपोषण सुरू केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी हे उपोषण सुरू आहे. या उपोषणामध्ये मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, जनहित व विधी विभागाचे अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर, निलेश चव्हाण, महिला अध्यक्षा समीक्षा मार्कंद्ये, उपशहर प्रमुख पुष्कर विचारे, सुशांत सूर्यराव, मनोहर चव्हाण, विश्वजित जाधव, करण खरे हे मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns continues hunger strike in thane against toll rate hike third day of fasting ssb

First published on: 07-10-2023 at 12:21 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×