टोल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी मुलुंड टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत गांधीगिरी आंदोलन केले. यापुढे मनसेकडून शांततेची अपेक्षा करु नये असा इशारा आंदोलकांनी टोल कंपनीला यावेळी दिला. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्यस्थितीत रस्त्याची देखभाल करीत नसून हे रस्ते मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आले आहेत. एकूण ५५ पैकी केवळ १३ उड्डाण पूलांची देखभाल एमएसआरडीसी प्राधिकरणाकडून केली जाते. त्यामुळे प्राधिकरण जर देखभाल करत नसेल तर त्यांच्यामार्फत टोल वसुल करणे चुकीचे आहे, असे मनसेचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> मराठी लोकांबद्दल टिप्पणी, कल्याण मध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांना मनसैनिकांचा चोप

chavadi political situation in maharashtra ahead of lok sabha election diwali organized by political leaders
‘सत्ता खूप वाईट, नंतर कुणी चहा सुद्धा पाजत नाही’, सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली खंत
Amit Shah
अमित शाहांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; म्हणाले, “निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा…”
rajan vichare emotional appeal
अन्याय सहन केलात… आता लढायला सज्ज व्हा; राजन विचारे यांचं भावनिक आवाहन 
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

टोल दरवाढ झालेली असून त्याविरोधात मसनेने आंदोलन सुरू केले आहे. रविवारी मनसेने ठाण्यातील चौकाचौकात आंदोलन केले होते. सोमवारी महात्मा गांधी यांच्या जंयतीचे औचित्य साधून मनसेचे शहरप्रमुख रवी मोरे यांनी मुलुंड चेकनाक्यावर ‘गांधीगिरी’ आंदोलन केले. काही कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींची वेशभुषा केली होती. त्यांनी टोलवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प दिले. हे शेवटचे शांततेचे आंदोलन आहे. यापुढे शांततेची अपेक्षा मनसेकडून करु नये असा इशारा मोरे यांनी यावेळी दिला. टोल बंद होणार नसेल तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढीव टोलवाढ रद्द करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आनंद परांजपे यांनी मनसेकडून नौटंकी सुरु असल्याचा आरोप केला होता. त्यावर मोरे यांनी उत्तर दिले. जे बाळासाहेबांचे झाले नाही, शरद पवार यांचे नाही झाले, उद्या ते आणखी कुठे जातील हे सांगता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आमची काळजी करु नये अशी टिकाही त्यांनी केली. यावेळी आंदोलनकर्त्यांना नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले.