ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. परंतु काही दिवसांपुर्वीच गडकरी रंगा़यतन नाट्यगृहात काव्य संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांसह इतर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पोलिसांना सुरक्षाव्यवस्था तैनात ठेवावी लागणार आहे. शिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील दोन ठिकाणांचे पर्याय सुचविले आहेत. मात्र ते पर्याय मनसेच्या स्थानिक नेत्यांना मान्य नसून त्यांनी मुस चौकातच सभा घेण्याचा आग्रह धरल्याचे चित्र आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत हिंदूत्वाचा पुरस्कार करत मदरशांवर धाडी घाला आणि मशिदींवरील भोंगे काढा असे विधान केले होते. या विधानानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर सतत टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ एप्रिलच्या नियोजित सभेच्या आयोजनाकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंच्या सभेला अद्याप परवानगी नाही

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात राज यांच्या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी नाकारलेली नाही. परंतु काही कारणामुळे ही सभा दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा पर्याय मनसेला दिला आहे.

गडकरी रंगायतनमध्ये ९ एप्रिलला काव्य संमेलनाचे आयोजन

गडकरी रंगायतनमध्ये ९ एप्रिलला काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून काही दिवसांपुर्वीच ठरलेल्या या कार्यक्रमाला निवृत्त न्यायाधीश, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर हे उपस्थित राहणार आहेत. या महत्वाच्या व्यक्तींमुळे पोलिसांना त्या दिवशी याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. त्यातच रस्त्यावर सभा झाली तर पोलिसांची तारंबळ उडू शकते.

हेही वाचा : पोलिसांनी राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेला परवानगी दिली नाही तर…; मनसेचा इशारा

एकाच वेळी दोन कार्यक्रमांचे नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवणे शक्य होणार नाही. त्याचबरोबर सभेमुळे परिसरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळेच सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील दोन ठिकाणांचे पर्याय सुचविले असून त्यात हायलॅंड मैदान आणि काशीनाथ घाणेकर नाट्यगृह या दोन ठिकाणांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचठिकाणी सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाहीतरी आम्ही त्याचठिकानी सभा घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns is insisting for mus chauk near gadkari rangaytan natyagrah thane for raj thackeray public meeting pbs
First published on: 06-04-2022 at 16:18 IST