Satyacha Morcha Mumbai Raj Thackeray Uddhav Thackeray March : ठाणे : निवडणुकांदरम्यान होत असलेल्या कथित गैरव्यवहारांवर आणि मतदारांच्या विश्वासघातावर निशाणा साधत महाविकास आघाडीने (MVA) निवडणूक आयोगाविरोधात भव्य मोर्चा जाहीर केला आहे. राज्यातील प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले असून, हा मोर्चा राजकीय पातळीवर मोठं आंदोलन ठरण्याची चिन्हं आहेत. या मोर्चाला “सत्याचा मोर्चा” असे नाव देण्यात आले असून त्यावर आता मनसे नेते अविनाश जाधव ( Avinash Jadhav) यांनी हे नाव देना मागचं कारण स्पष्ट केला आहे
मनसे नेते अविनाश जाधव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. मोर्चा आधी त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, अनेक जण विचारतात “मोर्चा कधी निघणार?”, “किती वाजता जायचे आहे. भारताच्या इतिहासात निवडणूक आयोगाविरोधात निघालेला हा सर्वात मोठा मोर्चा आहे. मनसेचा हा “सत्याचा मोर्चा” फक्त पक्षीय आंदोलन नसून, जनतेच्या मताचा आदर राखण्यासाठी उभारलेला सत्यासाठीचा संघर्ष आहे, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं.
म्हणून भाजप लगेच रस्त्यावर उतरला
भाजपाची मला भूमिकाच समजत नाही. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, पण प्रश्न असा आहे की तिचं भाजपाशी काही संगनमत आहे का? की निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची आयटी ब्रांच म्हणून काम करत आहे. आज निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाचा एक भाग झाल्यासारखा वागत आहे. त्यांच्या एखाद्या विंग विरोधात आंदोलन सुरू असेल म्हणून भाजप लगेच रस्त्यावर उतरला असेल, असे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं.
म्हणून ‘सत्याचा मोर्चा’ नाव
भाजप सारखे काही दलाल पक्ष ही मतं वळवतात. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे, पण प्रश्न असा आहे की, तिचं भाजपाशी संगनमत आहे का? की निवडणूक आयोग भाजपाची आयटी शाखा बनली आहे. ज्या मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान केलं, त्या प्रत्येकाचं मत हे एक सत्य आहे. पण जेव्हा ते मत योग्य उमेदवारापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा ते सत्य दडपलं जातं. त्या सत्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. म्हणूनच या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव दिले आहे, असे अविनाश जाधव म्हणाले.
