पात्रतेचा कोणताही निकष न लावता फक्त हुजरेगिरी करणाऱ्या तसेच वरिष्ठांवर दाणापाण्याची वैरण फेकणाऱ्या अपात्र, कुचकामी अधिकाऱ्यांना कल्याण डोंबिवलीतील वरिष्ठ साहाय्यक आयुक्त सारख्या जबाबदार नियुक्त करुन प्रभागातील विकास कामे, तेथील व्यवस्थेची वाताहत करत आहेत. या सगळ्या अनागोंदी प्रकारामुळे कल्याण डोंबिवली पालिकेतील अधिकाऱ्यांची अवस्था फेरीवाल्यांची सारखी झाली आहे, अशी टीका मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच

डोंबिवलीतील एमआयडीसीतील रस्ते कामांची पाहणी करण्यासाठी पाटील गुरुवारी आले होते. त्यावेळी ते पालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारावर बोलत होते. प्रत्येक प्रभागातून पालिकेच्या ठरावीक भागाचे काम चालते. हे काम व्यवस्थित चालले तर प्रभागातील कामे सुस्थितीत होतात. तेथील फेरीवाले, बेकायदा बांधकामे हे विषय थांबतात. प्रभागाचे नियंत्रण अपात्र, कुचकामी कारकुनांकडे देण्यात येत असेल तर चांगल्या कामाची अपेक्षा या साहाय्यक आयुक्तांकडून कोण करणार. प्रभागात येऊन सर्वच साहाय्यक आयुक्त फक्त बेकायदा बांधकामांमधून मलिदा वसूल करणे, फेरीवाल्यांकडून हप्ता खाणे याव्यतिरिक्त कोणतेही कामे करत नाहीत. नागरिकांच्या प्रश्नाकडे या अधिकाऱ्यांचे अजिबात लक्ष्य नसते. प्रभागातील अनेक बेकायदा बांधकामांच्या तक्रारी रहिवासी करतात. त्याची दखल हे अधिकारी घेत नाहीत. फक्त नवीन इमारती, बेकायदा इमारतींमधील सदनिकांना कर लावणे, धोकादायक इमारती पाडणे यामध्ये या साहाय्यक आयुक्तांना रस असतो, असे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा- कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा,वाहतूक कोंडी भर

एखाद्या साहाय्यक आयुक्ताची आयुक्तांकडे तक्रार झाली की त्याला फक्त दुसऱ्या प्रभागात बदली केले जाते. हाच साहाय्यक आयुक्त दुसऱ्या प्रभागात गेल्यावर तेच उद्योग सुरू ठेवतो. एकाच साहाय्यक आयुक्त एखाद्या प्रभागात तीन वर्षाहून अधिक काळ केवळ एका लोकप्रतिनिधीचा नातेवाईक म्हणून ठेवला जातो. इतर साहाय्यक आयुक्तांच्या नियमित बदल्या केल्या जातात. हे प्रशासनाला कसे चालते, असा प्रश्न आ.पाटील यांनी केला. अपात्र साहाय्य आयुक्त ही शहराला लागलेली मोठी कीड आहे हे वेळीच आयुक्त दांगडे यांनी लक्षात घ्यावे. अन्यथा ही मंडळी शहराचे आहे त्यापेक्षा बकालपण करायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी दिला.

हेही वाचा- ठाण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम

एखादा साहाय्यक प्रभागात किमान तीन वर्ष राहिला पाहिजे. तरच त्याच्या कामाचे मूल्यमापन होते. दर दोन दिवसांनी साहाय्यक आयुक्त गैरव्यवहार करतो. निष्काम राहतो म्हणून त्याची बदली केली जात असेल तर ते शहरालाही मारक आहे, असे आ. पाटील म्हणाले. डोंबिवली एमआयडीसीत नव्याने बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांची उंची दोन ते अडीच फूट असल्याने रस्ते उंची वाढून, आजुबाजुचे बंगले, इमारती खाली जाणार आहेत. पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी बंगले, सोसायटी आवारात जाऊन भीषण परिस्थिती उद्भवेल अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या. रस्ते उंच झाले तरी परिसराला त्याचा त्रास होणार नाही या पध्दतीने नियोजन केले जाईल, असे आश्वासन बांधकाम अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns mla pramod patil criticizes kalyan dombivli municipal officials thane dpj
First published on: 09-12-2022 at 12:26 IST