Premium

“कल्याण लोकसभेची वाटचाल भाजपा उमेदवाराच्या दिशेने”, मनसे आमदार राजू पाटलांचं सूचक वक्तव्य

कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढवली जाईल, असा दावा आमदार रोहत पवार यांनी केला होता.

MNS MLA Raju Patil
कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत आमदार राजू पाटील यांचं सूचक वक्तव्य (PC : Raju Patil Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची शुक्रवारी कल्याण येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी दावा केला की, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे हे आगामी निवडणूक भाजपाच्या चिन्हावर लढतील. आमदार रोहित पवारांच्या दाव्यावर कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, रोहित पवार यांचा तर्क बरोबर असू शकतो. मित्रपक्षाचं बळ कमी करणं हे भाजपाचं धोरण नेहमीच राहिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले, कल्याण लोकसभेची जागा पूर्वीपासून भाजपाचीच होती. परंतु, तेव्हा भाजपाचं या मतदारसंघात फार काही चालत नव्हतं. त्यामुळे शिवसेना नेते आनंद दिघे यांनी ही जागा भाजपाकडून खेचून घेतली. परंतु, आता इथे (कल्याणमध्ये) भाजपा वरचढ होताना दिसतेय. त्यामुळे भाजपावाले ही संधी सोडतील असं वाटत नाही.

आमदार राजू पाटील म्हणाले, भाजपाची एक पद्धत राहिली आहे. जसं की आमदार रोहित पवार म्हणाले, भाजपा नेहमीच समोरच्या पक्षाचं नुकसान करण्याचा, त्या पक्षाला दाबण्याचा प्रयत्न करते. रोहित पवार यांचं म्हणणं (कल्याण लोकसभेची जागा भाजपाच्या चिन्हावर लढवली जाऊ शकते) रास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही इथल्या वाटचाली बघा. कल्याण लोकसभेची वाटचाल ही भाजपा उमेदवाराच्या दिशेने सुरू आहे.

हे ही वाचा >> भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला द्वीपक्षीय करारांची चिंता; संरक्षणमंत्री म्हणतात; “जर आरोप सिद्ध झाले…!”

राजू पाटील म्हणाले, रोहित पवार यांना राजकीय वारसा आहे. त्यांच्या घरात चर्चा सुरू असतील. त्यातून त्यांना टीप मिळाली असेल. माझं त्यांच्या एका वाक्याला समर्थन आहे की कल्याण लोकसभेची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता आहे. कारण सध्या या मतदारसंघाची वाटचाल त्या दिशेने सुरू आहे. इथे सुरू असलेल्या वाटाघाटींवरू तसं दिसतंय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns mla raju patil says bjp candidate can contest in kalyan lok sabha elections asc

First published on: 25-09-2023 at 08:23 IST
Next Story
“भारत, इंडिया, हिंदुस्तान, काय जातंय ३ नावं घ्यायला?” राज ठाकरे यांची फटकेबाजी